
मुंबईच्या घाटकोपर रेल्वे स्थानकात काल (१३ जून) एका प्रवाशाचा मृत्यू झाला. लोकल ट्रेन आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकून प्रवाशाचा जीव गेल्याचे म्हटले जात आहे. ९ जून रोजी मुंब्रा आणि दिवा या दरम्यान ६ जणांचा मृत्यू झाला होता. मागील काही दिवसांपासून लोकल ट्रेनने प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या अपघातांमुळे सोशल मीडियावर चिंता व्यक्त केली जात आहे. अशातच एका व्हिडीओमुळे नेटकरी संतापले आहेत.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक तरुण लोकल ट्रेनच्या दरवाज्याला लटकून स्टंटबाजी करत असल्याचे पाहायला मिळते. तरुणाने एका हाताने ट्रेनचा दरवाजा पकडला आहे. दुसऱ्या हाताने तो ट्रेनच्या मार्गावर असणाऱ्या खांबावर थाप मारताना दिसते. त्याचा एक हात आणि एक पाय हवेत आहे. हा व्हिडीओ मध्य रेल्वेच्या कुर्ला स्थानकाजवळ असल्याचे म्हटले जात आहे. या व्हायरल व्हिडीओमधील हुल्लडबाज तरुणावर नेटकरी प्रचंड संतापले आहेत.
घाटकोपर रेल्वे स्थानकावर मृत्यू
घाटकोपरच्या प्लॅटफॉर्म नंबर एकवर १३ जून रोजी एका प्रवाशाचा मृत्यू झाला. हा प्रवासी प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मध्ये पडला. चक्कर आल्याने हा प्रवासी फ्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मध्यभागी पडल्याचे म्हटले जात आहे. या प्रवाशाला फटीतून बाहेर काढण्यात आला. पण उपचारांदरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
काही दिवसांपूर्वी मुंब्रा-दिवा या दरम्यान ट्रेनने लटकून प्रवास करताना ५ ते ६ जणांचा मृत्यू झाला होता. काल घाटकोपर प्रवासादरम्यान प्रवाशाचा मृत्यू झाला. अशा अपघाताच्या घटना वारंवार समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने प्रशासनाने उपाययोजना करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.