Mumbai : पावसाचा रेल्वेला फटका; 'लोकल' ट्रेन धीम्या गतीने सुरू

आज मुंबईसह नवी मुंबई, ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल (Local) सेवेला बसला आहे.
Local train
Local train saam tv
Published On

रश्मी पुराणिक

मुंबई : मुंबईसह (Mumbai) राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस (Rain) कोसळत आहे. मुंबईत काल पासून पावसाची संततधार सुरू होती. आज मुंबईसह नवी मुंबई, ठाण्याला मुसळधार पावसाने झोडपून काढलं आहे. मुसळधार पावसाचा फटका मुंबईतील लोकल (Local) सेवेला बसला आहे. त्यामुळे लोकल ट्रेन १० ते १५ मिनिटं विलंबाने धावत आहेत. त्यामुळे लोकल धीम्या गतीने सुरू असल्याने प्रवाशांचे हाल होत आहे. ( Mumbai Rain Update )

Local train
राज्यात पावसाचा तडाखा, सिंधुदुर्गचा वैभववाडी रेल्वे स्थानक परिसर जलमय

मुंबईसह नवी मुंबई, ठाण्यात सोमवारी सकाळपासून पाऊस जोरदार बरसत आहे. त्यामुळे या जोरदार पावसाचा फटका मुंबईच्या लोकल सेवेला बसला आहे. आज सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते ठाणे स्टेशन दरम्यान मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे या स्टेशनदरम्यान काही ठिकाणी रुळावर पाणी साचलं आहे. त्यामुळे मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेच्या काही ट्रेन या १०-१५ मिनिटं विलंबाने धावत आहे. तर हार्बर मार्गावरील ट्रेन्स १० मिनिटे विलंबाने धावत आहेत. मात्र, ट्रेन्स कुठेही थांबलेल्या नाहीत. तसेच ट्रेन्स हार्बर व नेरूळ/ बेलापूर खारकोपर मार्गावर ट्रेन्स सुरळीत सुरू आहेत.

Local train
कोकणात धुवांधार पाऊस; नद्यांनी ओलांडली इशारा पातळी

दरम्यान, गेल्या महिन्याभरापासून राज्यात ऊन पावसाचा खेळ सुरू होता. मात्र, सोमवारी मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, कोकणात मुसळधार पावासाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच पावसाची रिप रिप सुरू होती.तर संध्याकाळनंतर पावसाने जोर धरला आहे. तसेच नवी मुंबईतही मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांनंतर नवी मुंबईत चांगलाच धोर धरला आहे. नवी मुंबईत गेल्या तासाभरापासून मुसळधार पाऊस पडत आहे. पुढील ५ दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचे हवामान खात्याने देखील सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com