Mumbai Local : ठाकुर्ली- कल्याण दरम्यान पुन्हा अपघात; लोकलची धडक लागून एकाचा मृत्यू

Mumbai Local News : ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक दरम्यान धक्कादायक घटना घटना घडली आहे. रेल्वेरूळ ओलांडताना लोकलची ठोकर लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Mumbai Local
Mumbai LocalSaam Digital

गेल्या काही दिवसात मुंबई आणि उपनगरांमध्ये लोकलमध्ये अपघातांची मालिका सुरू आहे. दरम्यान आज पुन्हा ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थानक दरम्यान धक्कादायक घटना घटना घडली आहे. रेल्वेरूळ ओलांडताना लोकलची ठोकर लागल्याने एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. गेल्या काही दिवसातील कल्याण ते ठाणे मार्गावरील पाचवी घटना तर ठाकुर्ली रेल्वे स्थानक ते कल्याण रेल्वे स्थाकादरम्यान तीन दिवसातील दुसरी घटना आहे.

मुंबई आणि लोकल ट्रेनमध्ये गेल्या काही दिवसांपासून अपघातांची मालिका सुरू झाली आहे. तीन दिवसांपूर्वी कल्याण ठाकुर्ली दरम्यान लोकलमधून पडून मैनुद्दीन शहा या तरुणाचा मृत्यू झाला होता. आतपर्यंत कल्याण ठाणे दरम्यान ६ अपघात झाले असून ५ जणांनी जीव गमावला आहे.

त्याआधी मध्य रेल्वेवर प्रवाशांना लुटणाऱ्या तरुणांना विरोध करणाऱ्या एका प्रवाशाचा लोकलमध्येच खून करण्यात आला होता. याघटनेनंतर खडवली वाशिंदे दरम्यान ही धक्कादायक घटना घडली होती.

Mumbai Local
PM Modi Rally: काँग्रेस, आरक्षण आणि 26/11; अहमदनगरमध्ये PM मोदींची विरोधकांवर चौफेर फटकेबाजी

खडवली वाशिंदे दरम्यान घडलेल्या घटनेच्या आदल्याच दिवशी तरुणाला धावत्या ट्रेनमधून खाली ढकलून देण्यात आलं होतं. लोकलमध्ये झालेल्या भांडणातून चौघांनी त्याला ट्रेनमधून ढकलून दिलं. ट्रॅकवर पडल्यानंतर त्याच्या हातावरून ट्रेनचं चाक त्याच्या हातावरून गेलं. यात त्याचा हात कायमचा निकामी झाला. पायही फ्रॅक्चर झाला. उत्तर प्रदेशमधील हा तरुण आठवडाभरापूर्वीच मुंबईत आयुष्यभराची स्वप्ने घेऊन आला होता. ही स्वप्नं एका क्षणात बेचिराख झाली.

Mumbai Local
Kalyan Crime News: नकली नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न फसला, दिल्लीतील युवकाला कल्याणमध्ये अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com