Mega Block : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्त्वाची बातमी; रविवारी 'या' मार्गावर मेगाब्लॉक, कधी आणि कुठे? पाहा

मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेने हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे.
Central Railway harbour line
Central Railway harbour line Saam tv

रुपाली बडवे

mumbai Mega Block News : मुंबईच्या चाकरमान्यांसाठी महत्वाची बातमी आहे. रविवारी रेल्वेने हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. तर रविवारी मध्य रेल्वेवरील सेवा सुरू राहणार आहे. (Latest Marathi News)

Central Railway harbour line
DGCA Advisory: विमानातून प्रवास करताय? नियमांचं उल्लंघन केलं तर... काय आहेत नव्या गाइडलाइन्स?

मध्य रेल्वेकडून रविवारी ट्रान्सहार्बर आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. त्यामुळे ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक असेल.

ठाणे येथून सकाळी १०.३५ ते सायंकाळी ४.०७ वाजेपर्यंत वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी/नेरुळ/पनवेल येथून सकाळी १०.२५ ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत ठाण्यासाठी सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

हार्बर मार्गावर 'असा' असेल मेगाब्लॉक

रविवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.०९ वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/वडाळा रोड येथून सकाळी ११.०४ ते सायंकाळी ४.४७ वाजेपर्यंत या वेळेत वाशी/बेलापूर/पनवेलकरिता सुटणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगावकडे जाणारी डाउन हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी १०.०७ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Central Railway harbour line
Personal Finance: नवीन वर्षात या सवयी स्वत:ला लावा; पैशांची अडचण कधीच येणार नाही

तथापि, ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्रमांक ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना दि. ८.१.२०२३ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी असेल. तर दुसरीकडे मध्य मार्गावर मेगाब्लॉक नसेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com