DGCA Advisory: विमानातून प्रवास करताय? नियमांचं उल्लंघन केलं तर... काय आहेत नव्या गाइडलाइन्स?

विमान कंपन्यांनी बेशिस्त प्रवाशांवर कारवाई न करून विमान प्रवासाची प्रतिमा मलिन केली आहे, असं डीजीसीएने म्हटलं.
airplane,
airplane,saam tv

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसात विमानात प्रवाशांकडून गैरवर्तवणुकीचे काही प्रकार समोर आले होते. यानंतर आता डीजीसीए अर्थात डायरेक्टोरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनने शुक्रवारी सर्व एअरलाईन्स ऑपरेशन्स प्रमुखांना फ्लाइटमधील प्रवाशांचा समावेश असलेल्या अलीकडील घडामोडींवर एक अॅडव्हाजरी जारी केली आहे.

डीजीसीएने सर्व एअरलाईन्स ऑपरेशन्सच्या प्रमुखांना फ्लाइटमधील अनियंत्रित प्रवाशांना हाताळण्यासाठी आणि नियमांनुसार संबंधित जबाबदाऱ्यांबाबत अॅडव्हाजरी जारी केली आहे. विमान कंपन्यांनी बेशिस्त प्रवाशांवर कारवाई न करून विमान प्रवासाची प्रतिमा मलिन केली आहे, असं डीजीसीएने म्हटलं. (Latest Marathi News)

airplane,
Delhi Sultanpuri Case: दिल्ली कांझावाला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा अपघात की हत्या? 'त्या' व्हिडिओनंतर गूढ वाढलं

विमानात असभ्य वर्तन करणाऱ्या प्रवाशांवर एअरलाइन्सने कारवाई केली नाही तर डीजीसीए त्यांच्यावर कारवाई करेल, असे डीजीसीएने म्हटले आहे. नुकत्याच एअर इंडियाच्या फ्लाइटमध्ये एका प्रवाशाने सी फ्लायरवर लघवी केल्याने मोठ्या प्रमाणात संतापाच्या पार्श्वभूमीवर हा सल्ला देण्यात आला आहे.

airplane,
Delhi Mayor Election : दिल्ली महापालिकेत मोठा गोंधळ, भाजप अन् आप नगरसेवकांमध्ये राडा

अॅडव्हायझरी जारी करताना, DGCA ने म्हटले आहे की, अलीकडच्या काळात, महासंचालनालयाने उड्डाण दरम्यान विमानातील प्रवाशांच्या अनियंत्रित वर्तन आणि अनुचित वर्तनाच्या काही घटना लक्षात घेतल्या आहेत. ज्यामध्ये असे निदर्शनास आले आहे की पायलट आणि केबिन क्रू सदस्य योग्य कारवाई करण्यात अपयशी झाले आहेत. गैरकृत्यांमध्ये विमान कंपन्यांनी कारवाई न करणे यामुळे समाजातील विविध घटकांमध्ये विमान प्रवासाची प्रतिमा खराब होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com