Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले

Mumbai News : मुंबईतील गणेशोत्सवाचा शाही सोहळा लालबागच्या राजाच्या विसर्जनाने संपन्न झाला. तब्बल ३३ पेक्षा जास्त तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर भाविकांच्या जल्लोषात आणि अश्रूंनी गणरायाला निरोप दिला.
Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले
Mumbai newsSaam Tv
Published On
Summary
  • लालबागच्या राजाचे विसर्जन तब्बल ३३ तासांच्या मिरवणुकीनंतर गिरगाव चौपाटीवर झाले.

  • लाखो भाविकांनी डोळ्यांत अश्रू आणि मुखी “गणपती बाप्पा मोरया” गजर करत निरोप दिला.

  • ११ दिवस दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती, दररोज भाविकांची जनसागर उसळला होता.

  • हा विसर्जन सोहळा फक्त एका मंडळाचा नाही, तर महाराष्ट्राच्या श्रद्धेचे प्रतीक ठरला.

मुंबईतील गणेशोत्सवाचा सर्वात मोठा सोहळा मानला जाणारा लालबागचा राजा अखेर विसर्जन झाले. भरती आहोटीमुळे झालेल्या विलंबानंतर अखेर ९ वाजून १० मिनिटांनी लालबाग राजाचे विसर्जन करण्यात आले. काल रात्री मुंबईतील प्रमुख मंडळांच्या गणपतींच्या मुर्त्यांचे विसर्जन झाले. तब्बल ३३ तासांपेक्षा अधिक तास मिरवणूक चालल्यानंतर आज रात्री गिरगाव चौपाटीवर लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्या क्षणी चौपाटीवर लाखो भाविकांची गर्दी झाली होती. "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" अशा गजरांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यंदा ११ दिवस लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी लाखो भाविकांनी ओढ घेतली होती. भल्या पहाटेपासूनच रांगा लागल्या होत्या. कोणी नवस फेडण्यासाठी आले होते, तर कोणी फक्त दर्शन घेऊन मन:शांती अनुभवण्यासाठी आले होते. राजाच्या दरबारात दररोज भक्तांचा जनसागर लोटत होता. लालबागच्या राजाचे वैभव, देखाव्याची भव्यता आणि भक्तांच्या श्रद्धेने यंदाही अवघा महाराष्ट्र भारावून गेला होता.

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले
Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी लालबागच्या मंडपातून राजाची भव्य मिरवणूक निघाली. डोल-ताशांचा गजर, झांजांच्या गजरासह राजाचे रथ पुढे सरकत होते. मुंबईतील प्रमुख चौकांमधून मार्गक्रमण करताना नागरिकांनी राजाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. रस्त्याच्या कडेला उभे राहून, इमारतींच्या गच्च्यांवरून करून राजाचे दर्शन घेतले. यावर्षीच्या विसर्जन मिरवणुकीच वैशिष्ट्य म्हणजे अत्याधुनिक तराफा राजाच्या विसर्जनासाठी बनवण्यात आला होता.

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले
Ganpati Visarjan : मुंबईतील 'या' गणपतीचे विसर्जन नाही, गणरायाला पुन्हा चौपाटीवरून मंडपात आणणार, मंडळाने का घेतला निर्णय?

संपूर्ण मार्गावर भाविकांकडून राजावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरूच होती. भक्तांच्या जयघोषामुळे मुंबईचे वातावरण भक्तिमय झाले होते. भर पावसात लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळेच राजाच्या दर्शनाने तृप्त झाले.

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले
Gauri Ganpati : फक्त ५०० रुपयांची सुंदर जोडवी; गौरीसाठी बायकोला खास गिफ्ट

आज सकाळी अखेर लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला. विसर्जनावेळेस राजाला तिरंगा फडकवून मानवंदना देण्यात आली. यावेळेस प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांनी हजेरी लावली. पोलीस, स्वयंसेवक आणि स्थानिक प्रशासनाने संपूर्ण मिरवणुकीची उत्कृष्ट व्यवस्था केली होती. विसर्जनाची वेळ जवळ येताच भाविकांच्या डोळ्यांतून अश्रू अनावर झाले. गेल्या ११ दिवसांचा उत्साह, आनंद, भक्ती आणि भावनांचा महासागर त्या एका क्षणी ओसंडून वाहत होता.

Lalbaugcha Raja Visarjan : ‘पुढच्या वर्षी लवकर या’ लालबागच्या राजाचं विसर्जन, निरोप देताना भाविकांचे डोळे पाणावले
Ganpati Visarjan 2024: दिवस उजाडताच 'डी. जे'चा दणका! मुंबई, पुण्यात विसर्जन मिरवणुका अद्यापही सुरु; १८ तासांनी लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर दाखल

राजाच्या विसर्जनावेळी हजारो भाविकांनी एकच स्वरात "गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या" असा गजर केला. लालबागच्या राजाचे विसर्जन म्हणजे फक्त एका मंडळाचा उत्सव नसतो, तर तो संपूर्ण महाराष्ट्राच्या संस्कृतीचे, श्रद्धेचे प्रतीक असतो. मुंबईकरांसाठी हा सोहळा म्हणजे भावनांचा उत्सव आहे. गणरायाचे विसर्जन जरी झाले असले तरी त्याची भक्ती, आनंद आणि आठवणी कायमच प्रत्येकाच्या मनात घर करून राहणार आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com