Mumbai : मुंबईत मध्यरात्री भीषण दुर्घटना! MMRDAची क्रेन कोसळून ८ ते १० जण जखमी, वाहनांचा चक्काचूर

Mumbai Kurla Accident News : मुंबईतील कुर्ल्याच्या कुरेशी नगरमध्ये डिमोलिशनच्या कामादरम्यान जड क्रेन उलटली. दोन घरांसह वाहनांचे नुकसान झाले असून ४ ते ५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
Mumbai Kurla Crane Accident During Demolition Work | Qureshi Nagar
Mumbai Kurla Crane Accident During Demolition Work | Qureshi NagarGoogle
Published On
Summary
  • कुर्ल्याच्या कुरेशी नगरमध्ये डिमोलिशनच्या कामादरम्यान क्रेन कोसळली

  • पोकलेन मशीन इमारतीच्या वरच्या भागात नेत असताना क्रेनचा तोल गेला

  • मुंबई लोकलच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवरही क्रेनचा भाग पडला

  • प्राथमिक माहितीनुसार ८ ते १० जण जखमी

मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. मुंबईतील कुर्ला येथील कुरेशी नगर परिसरात गुरुवारी मध्यरात्री डिमोलिशनच्या कामादरम्यान मोठा अपघात झाला. इमारत पाडण्याच्या कामासाठी वापरण्यात येणारी एक जड क्रेन अचानक उलटली. या क्रेनच्या मदतीने पोकलेन मशीन इमारतीच्या वरच्या भागात नेण्याचे काम सुरू होते. त्याचवेळी अचानक क्रेनचा तोल गेला आणि ती जोरात जमिनीवर कोसळली. क्रेनचा काही भाग जवळील दोन घरांवर तसेच मुंबई लोकलच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर पडल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या दुर्घटनेत ८ ते १० जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

डिमोलिशनच्या कामादरम्यान दुर्घटना

कुरेशी नगर परिसरातील एका जुन्या इमारतीच्या पाडकामाचे काम सुरू होते. पोकलेन मशीन इमारतीच्या वरच्या भागात नेण्यासाठी मोठ्या क्रेनचा वापर करण्यात आला होता. मशीन वर उचलत असताना अचानक क्रेनचा तोल बिघडला. काही क्षणांतच संपूर्ण क्रेन उलटली आणि तिचा मोठा भाग आजूबाजूच्या परिसरात कोसळला. क्रेनचा काही भाग दोन घरांवर पडल्याने घरांमध्ये असलेल्या नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली. काही जण मलब्यात अडकल्याची माहिती असून स्थानिक नागरिक आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले.

Mumbai Kurla Crane Accident During Demolition Work | Qureshi Nagar
Weather Update : महाराष्ट्रातील ५ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस; हवामान खात्याचा सतर्कतेचा इशारा, वाचा A to Z अपडेट्स

घरांसह वाहनांचेही नुकसान

या अपघातात दोन घरांचे नुकसान झाले असून परिसरातील एक कार आणि ऑटो-रिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे. क्रेनचा भाग मुंबई लोकलच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक वायरवर पडल्याने रेल्वे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला. खबरदारीचा उपाय म्हणून घटनास्थळाचा परिसर सुरक्षित करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस, अग्निशमन दल आणि इतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. सध्या क्रेन हटवण्याचे आणि परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू आहे.

घटनेचा तपास सुरु

दरम्यान, क्रेन नेमकी कोणत्या कारणामुळे उलटली, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. तांत्रिक बिघाड, क्षमतेपेक्षा अधिक वजन किंवा कामादरम्यान झालेली चूक यापैकी नेमके कारण काय होते, याचा तपास केला जात आहे. बांधकाम आणि डिमोलिशनच्या कामात सुरक्षा नियमांचे पालन झाले होते का, याचीही चौकशी केली जाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com