Mumbai : किंग्ज सर्कल रेल्वे पुलाला ट्रकची जोरदार धडक; वाहतूक मंदावली, पोलिसांची माहिती

मुंबईकरांनो...! तुम्ही जर किंग्ज सर्कलच्या दिशेने जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे.
Mumbai Kings Circle Railway Bridge Accident
Mumbai Kings Circle Railway Bridge AccidentSaam Tv
Published On

Mumbai Kings Circle Railway Bridge Accident : मुंबईकरांनो...! तुम्ही जर किंग्ज सर्कलच्या दिशेने जाणार असाल, तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण, सायन (Mumbai) येथील किंग सर्कलच्या पुलाला धडकून एका ट्रकचा मोठा अपघात झाला आहे. या धडकेत रेल्वे पुलाचा खांब तुटून खाली पडल्याने वाहतूक मंदावली आहे. यासंदर्भातील माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

Mumbai Kings Circle Railway Bridge Accident
Aaditya Thackeray : भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरेही सहभागी होणार? सूत्रांची साम टीव्हीला माहिती

अपघाताची माहिती मिळताच, वाहतूक पोलिसांसह आरपीएफ पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुलाखाली अडकलेला अपघातग्रस्त ट्रक (Truck Accident) बाजूला घेण्याचं काम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार ट्रकची धडक एवढी जोरदार होती की, रेल्वे पुलाचा संपूर्ण पिलर तुटून खाली पडला.

दरम्यान, या भीषण अपघातामुळे दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सकाळच्या दरम्यान सायन गांधी मार्केट येथील पुलाच्या एकाबाजूने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. या अपघातात रेल्वे पुलाचे मोठे नुकसान झाले आहे.

अपघाताची माहिती मिळताच, घटनास्थळी वाहतूक पोलिसांनी धाव घेतली. सध्या अपघातग्रस्त ट्रकला बाजूला घेण्याचे काम सुरू आहे. जेणेकरून या परिसरातील वाहतूक सुरळीत होऊन वाहनचालकांना कोणत्याही प्रकारचा अडथळा येणार नाही. यासंदर्भातील माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com