Modern facilities for women in Mumbai : कधीही अन् कुठंही करा आंघोळ, महिलांसाठी पहिलं फिरतं स्नानगृह, कसा आहे हा प्रोजेक्ट? वाचा

Kandivali modern mobile bathrooms : कांदिवलीत राहणाऱ्या लोकांसाठी राज्यय सरकारने मोठा निर्णय घेतला. कांदिवलीत राहणाऱ्या महिलांसाठी पहिलं फिरतं स्नानगृह सुरु करण्यात आलं आहे. वाचा संपूर्ण प्रोजेक्टविषयी माहिती
 कधीही अन् कुठंही करा आंघोळ, महिलांसाठी पहिलं फिरतं स्नानगृह, कसा आहे हा प्रोजेक्ट? वाचा
facilities for women in Mumbai Saam tv
Published On

मुंबईतील कांदिवली पूर्व येथे राहणाऱ्या महिलांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या भागातील महिलांसाठी भारतातील पहिल्या अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या फिरत्या स्नानगृहाचे उद्घाटन करण्यात आलं आहे. कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा आणि मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हा नियोजन समिती यांच्या संकल्पनेतून या प्रोजेक्टची निर्मिती करण्यात आली. झोपडपट्टीमधील भगिनींना सदर स्नानगृहांचा अतिशय फायदा होणार आहे. या प्रकल्पामुळे स्वच्छ भारत घडवण्याच्या दृष्टीने आपण एक पाऊल पुढे जात आहोत, असे मंत्री लोढा यांनी सांगितले. हे स्नानगृह महिलांना वापरासाठी सुरू राहील

 कधीही अन् कुठंही करा आंघोळ, महिलांसाठी पहिलं फिरतं स्नानगृह, कसा आहे हा प्रोजेक्ट? वाचा
BJP State President News : भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीचा मुहूर्त कधी? महत्वाची माहिती आली समोर | VIDEO

मंत्री लोढा म्हणाले, झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलांसाठी स्नानगृहाची समस्या अतिशय त्रासदायक ठरतं. त्यामुळे त्यांचा त्रास कमी करण्यासाठीच आम्ही जिल्हा नियोजन समितीमार्फत भारतातील पहिल्या फिरत्या स्नानगृहाचा प्रकल्प राबवला आहे'. या प्रकल्पासाठी सहकार्य केल्याबद्दल आमदार अतुल भातखळकर यांचे आभार मंत्री मंगल प्रभात यांनी मानले. मी सर्वांना आवाहन करतो की, या प्रकल्पाचा उपयोग करावा. इतर ठिकाणी देखील सदर प्रकल्प राबवू'.

 कधीही अन् कुठंही करा आंघोळ, महिलांसाठी पहिलं फिरतं स्नानगृह, कसा आहे हा प्रोजेक्ट? वाचा
BJP State President News : भाजप प्रदेशाध्यक्ष निवडीचा मुहूर्त कधी? महत्वाची माहिती आली समोर | VIDEO

मंत्री मंगल प्रभात लोढा पुढे म्हणाले, 'महिलांसाठी फिरते स्नानगृह असावे यासाठी कार्य सुरू केले होते. त्यांच्या संकल्पनेप्रमाणे एका बसमध्ये अत्याधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधा असलेले स्नानगृह उभारण्यात आलंय. या बसमध्ये एकूण ५ स्नानगृहे आहेत. त्यात शॉवर देखील आहे. या बसमध्ये २१०० लिटर इतक्या लिटर पाण्यची क्षमता आहे. या स्नानगृहासहित बेसिन आणि इतर आवश्यक सुविधांचाही समावेश आहे. या बसमध्ये महिलांना कपडे वाळवण्यासाठी २ ड्रायर मशीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. विद्युत पुरवठ्यासाठी जनरेटर्सचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती लोढा यांनी दिली.

 कधीही अन् कुठंही करा आंघोळ, महिलांसाठी पहिलं फिरतं स्नानगृह, कसा आहे हा प्रोजेक्ट? वाचा
Eknath Shinde Threat: एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी, सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

'पाण्याचा आणि वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी आणि योग्य नियोजनातून सर्वांना स्नानगृहाचा वापर करण्याची संधी मिळावी याकरिता या स्नानगृहात महिला कर्मचारी नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रत्येक महिलेला ५ ते १० मिनिटे इतका वेळ स्नानासाठी दिला जाईल. तसेच प्रत्येक महिलेची वेळ झाल्यावर पाणी पुरवठा बंद होणार आहे, अशी माहीती हाती आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com