Double Decker Bus : ८६ वर्षांची साथ सुटणार..., मुंबईकरांची लाडकी 'डबल डेकर बस' इतिहास जमा

Double Decker Buses To Go Off road : मुंबईच्या धावत्या रस्त्यावर सगळ्यांची लाडकी बस आता पाहाता येणार नाही.
Double Decker Bus
Double Decker BusSaam Tv

Mumbai Iconic Double Decker Bus :

मुंबई दर्शन असो किंवा गेटवे ऑफ इंडिया सगळ्यांचा प्रवास सुखद करणारी डबल डेकर बस. मुंबईसारख्या वर्दळच्या भागात डबल डेकर पाहिली की, लहान मुलांची उत्सुकता वाढायची. लाल रंग हा अनेकांचा आवडता आणि आकर्षणाचा केंद्र बिंदू त्यामुळे मुलांना या डबल डेकरमध्ये फिरण्याची इच्छा अधिक असायची. मुंबई दर्शन करायचे असले की, लांबलचक रांगांमध्ये उभे राहून तिकीट काढण्याची हौस आणि डबल डेकरचा हा प्रवास सगळ्यांचा आवडता होता.

सिनेसृष्टीपासून ते मालिकांपर्यंत अनेकांनी मुंबईचे दर्शन याच डबल डेकर बसमधून दाखवला गेला. बसमध्ये घडलेला किस्सा असो किंवा त्यातून घडलेला अभिनेता. यातून मुंबई दाखवताना त्याचं चित्रीकरणं आजही आठवते त्यामुळं बसची क्रेझ वाढत गेली. कधी खिडकीजवळ तर कधी गप्पा मारत आपण मनसोक्त प्रवास केला असेलच. पूर्वीच्या काळी मुंबईची लाइफलाईन म्हणून ओळखली जाणारी डबल डेकर बस लवकरच इतिहास जमा होणार आहे.

Double Decker Bus
Gold Silver Rate (15th September): खरेदीदारांना झटका! सोन्याच्या भावात उसळी, चांदीही चकाकली; तुमच्या शहरातील आजचे दर किती?

मुंबईकरांच्या (Mumbai) व्यस्त जीवनशैलीत पण गरजेच्या वेळी दिलेला ८६ वर्षांचा अविरत साथ सुटणार आहे. ब्रिटिशांनी भारतात (India) आणलेल्या या डबल डेकर बसचा प्रवास थांबला आहे. जुनी डबल डेकर बस शुक्रवारी मुंबईच्या रस्त्यांवर शेवटचा प्रवास करणार आहे.

आज १५ सप्टेंबरपासून डिझेलवर चालणारी डबल डेकर बस बंद करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे मुंबईच्या धावत्या रस्त्यावर सगळ्यांची लाडकी बस आता पाहाता येणार नाही. १९३७ मध्ये डबल डेकर बसेस मुंबईच्या रस्त्यावर धावू लागल्या. ओपन टॉप डबल डेकर बस १९९७ रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं सुरु केल्या होत्या. परंतु, पंधरा वर्षाच्या सेवेनंतर आता या बसेस बंद करण्यात आल्या आहेत.

Double Decker Bus
How To Control Overweight : सुटलेलं पोट कमी करायचंय?, आजपासूनच स्वत:मध्ये करा 'हे' बदल

९० च्या दशकाच्या मध्यानंतर या बसेस जुन्या होऊ लागल्यानं यांची वाढत जाणारी संख्या कमी झालीये. बदलत्या जगानुसार बेस्टच्या ताफ्यात ओपन डेक बसचाही समावेश झाला परंतु, आता ५ ऑक्टोबरपासून बेस्टच्या ताफ्यातून हटवल्या जाणार आहेत.

डिझेलवर धावणाऱ्या बसेसची जागी इलेक्ट्रिकवर चालणाऱ्या डबल डेकर बसेस घेणार आहेत. या नव्या बसेसचा (Bus) रंग रेड आणि व्हाईट असेल. तसेच पर्यटकांसाठी लवकरच ओपन डेक बसेसही खरेदी केल्या जाणार आहेत. त्याही इलेक्ट्रिक स्वरुपात असतील.

यावर्षी फेब्रुवारीतच बेस्टच्या ताफ्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बसेस आल्या. त्यामुळे मुंबई दर्शन आता एसीच्या गारव्यासोबत सुखद होईल का हे पाहवं लागणार आहे.

Double Decker Bus
Benefits Of Soaked Raisins : आठवडाभर खा भिजवलेले मनुके, हे ५ आजार होतील छुमंतर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com