Virar Building Collapse: विरारमध्ये मोठी दुर्घटना! धोकादायक इमारतीचा सज्जा कोसळला; रहिवाशी सुखरुप

शहरात अद्यापही ७९ धोकादायक इमारती आहेत असा अहवाल इमारतीचे सर्वेक्षणात समोर आला होता.
Virar Building Collspe
Virar Building CollspeSaamtv
Published On

Vasai Virar Building Collaspe: वसई विरार शहरात गेल्या काही दिवसांपुर्वीच इमारत कोसळल्याची घटना समोर आली होती. आता पुन्हा एकदा विरार पश्चिमेकडील एम बी इस्टेट येथील न्यूव स्वस्तिक कॉम्प्लेक्स या इमारतीचा सज्जा कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली.

गुरुवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला असून या घटनेत कोणतीही जीविहानी झाली नाही. मात्र वीस दिवसांत दोन दुर्देवी घटना घडल्याने परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Virar Building Collspe
Nandurbar News : शिवरायांच्या प्रेरणेतून स्वतःचे नाव बदलले; गडकिल्ले भ्रमंतीसाठी सायकलने प्रवास

याबाबत अधिक माहिती अशी की, विरार पश्चिमेकडील (Virar) एम बी इस्टेट येथील न्यूव स्वस्तिक कॉम्प्लेक्स इमारतीचा सज्जा गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास कोसळला. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वसई विरार शहर पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी झाले.

तसेच इमारतीतील अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढून त्यांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले. यावेळी प्रभाग समिती ए चे सहायुक्त शशिकांत पाटील यांनी नागरिकांच्या राहण्याची व्यवस्था केली असल्याचे माहिती सामटीव्हीशी (Saamtv) बोलताना दिली आहे

Virar Building Collspe
Irshalgad Landslide News : आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ सगळे दरडीखाली अडकले, आश्रमशाळेत असलेल्या मुलीचे भयावह दृष्य पाहून अश्रू थांबेना

धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर?

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वसई विरार शहर महापालिकेच्या वतीने शहरातील धोकादायक इमारतीचे सर्वेक्षण करण्यात आले होते. यावेळी शहरात अद्यापही ७९ धोकादायक इमारती आहेत असा अहवाल समोर आला होता.

महत्त्वाची बाब म्हणजे निष्काशन बाकी असलेल्या ५८ इमारतीत रहिवासी राहत असल्याने पावसाळ्यात दुर्घटनेचा धोका कायम आहे. तर एकुण ३४३ इमारतीपैकी २५८ इमारती पालिकेने निष्कासीत केल्या असून ७९ इमारतींना निष्कासन करण्याच्या पालिकेने नोटिसा बजावल्या असल्याची माहिती पालिकेने साम टीव्हीला दिली आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com