सागर निकवाडे
नंदूरबार : महाराष्ट्रातील गड किल्ल्यांचा वेड असलेला केरळ (Keral) राज्यातील हमराज एस के उर्फ शिवराज गायकवाड हा शिवप्रेमी महाराष्ट्रात असलेले गड किल्ले आणि दुर्ग भ्रमतीसाठी निघाला आहे. नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील सुल्तानपूर गावात त्यांचं शिवप्रेमींनीकडून स्वागत करण्यात आले- त्याने आतापर्यंत १५ हजार किलोमीटरचा सायकल प्रवास केला आहे. (Tajya Batmya)
नंदूरबार जिल्ह्यातील भुईकोट किल्ले बघण्यासाठी शिवराज गायकवाड आला असून त्याने आतापर्यंत १५ हजार किमीचा प्रवास केला असून २५० किल्यांना भेटी दिल्या आहेत. राज्यातील एकूण ३७० किल्ले भ्रमनतीसाठी निघाला आहे. शिवराज गायकवाड हा सायकलीवरून गडकिल्ल्यांचा प्रवास करत असताना प्रवासात त्याने विविध मान्यवरांची भेट घेतली असून (Satara) सातारा येथील उदयनराजे भोसले, संभाजी राजे, शिवेंद्रराजे भोसले यास अनेक मान्यवरांचे मार्गदर्शनाने शिवराजचा प्रवास सुरू आहे. दरम्यान सातारा येथील उदयनराजे भोसले यांनी त्यांना सायकल भेट म्हणून दिली आहे.
शिवरायांच्या कार्याने प्रभावित होत बदलले नाव
हमराज एस के हा केरळ राज्यातील असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने त्याने महाराष्ट्रातील गड किल्ले सफर करण्याची मोहीम हाती घेतली आहे. महाराजांच्या कार्याने प्रभावित होत हमराज इसके यांनी आपलं नाव बदलून शिवराज गायकवाड असं केलं आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.