मुंबई - मुंबईत Mumbai सतत सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे Rain गोवंडी Govandi भागात इमारतीचा Building भाग कोसळल्याने collapse मोठी दुर्घटना घडली आहे. आज सकाळी पाच वाजेच्या सुमारास इमारतीचा काही भाग कोसळला आहे. इमारतीचा भाग कोसळल्याने या दुर्घटनेत ३ जणांचा मृत्यू Death झाला आहे तर १० जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गोवंडीतील शिवाजीनगर येथील बॉम्बे रुग्णालयाजवळ ही इमारत आहे. तळमजला अधिक दोन मजला असलेल्या इमारतीचा भाग कोसळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ढिगाऱ्याखालून १० जणांना वाचवण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. फैजल कुरेशी , नमरा कुरेशी , शाहिना कुरेशी अशी मृतांची नावे आहेत.
दरम्यान, राज्यभरात पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या ठिकाणी पावसाची संततधार सुरु आहे. यामुळे अनेक ठिकाणी इमारती कोसळण्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी चेंबूर, विक्रोळी आणि भांडूपमध्ये झालेल्या ३ दुर्घटनांमध्ये २५ लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. तर भांडूपमध्येही भिंत कोसळून एका १६ वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे चिपळूण, खेडमध्ये यासह अन्य परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. तर, रायगड, महाडमध्ये देखील दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. रायगडमध्ये दरड कोसळून ४ जणांचा मृत्यू झाला असून ५ जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
Edited By - Shivani Tichkule
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.