Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतुकीत मोठे बदल; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची होणार फजिती

Mumbai Goa Mahamarg : तुम्ही जर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, उद्या म्हणजेच गुरुवारपासून सलग ३ दिवस महामार्ग ४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
Mumbai Goa Highway
Mumbai Goa HighwaySaam TV
Published On

तुम्ही जर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. कारण, उद्या म्हणजेच गुरुवारपासून सलग ३ दिवस महामार्ग ४ तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. ११ ते १३ जुलै दरम्यान सकाळी आणि दुपारच्या वेळेत महामार्गावर ब्लॉक घेतले जाणार आहेत. कोलाड जवळील पूई येथे पुलाच्या कामानिमित्त हा निर्णय घेण्यात आला आहे.

Mumbai Goa Highway
Earthquake Video : जमीन हादरली, लोक पळतच सुटले; हिंगोलीतील भूकंपाचा थरारक VIDEO समोर

महामार्ग वाहतूक पोलीस विभागाने यासंदर्भातील अधिसूचना जारी केली असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे (Mumbai Goa Mahamarg) काम सध्या वेगाने सुरू आहे. कोलाड जवळील म्हैसदरा नदीवर नवीन पुल बांधण्यात येणार आहे.

त्यासाठी 5 गर्डर टाकण्यात येणार आहे. गुरुवार ११ जुलै ते १३ जुलै असे सलग तीन दिवस गर्डर टाकले जाणार आहे. त्यासाठी महामार्गावरील वाहतूक सकाळी ६ ते ८ आणि दुपारी २ ते ४ या काळात बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांना वाकण पाली मार्गे माणगाव असा प्रवास करता येणार आहे.

मुंबई-गोवा महामार्ग प्रवास पर्यायी मार्ग

  • वाहनचालकांना वाकण - पाली - भिसेखिंड - रोहा कोलाड मार्गे मुंबई गोवा महामार्गावर जाता येईल.

  • वाकण येथून महामार्गावरील वाहतूक पाली, रवाळजे, निजामपूर माणगाव येथे मुंबई गोवा महामार्गाला पुढे जाता येईल.

  • याशिवाय खोपोली - पाली - रवाळजे - निजामपूर - माणगाव मार्गे मुंबई गोवा महामार्ग असा पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Mumbai Goa Highway
Heavy Rain Alert : महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांमध्ये आज मुसळधार पाऊस; विदर्भ-मराठवाड्याला पावसाचा यलो अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com