Mumbai : ठाकरे-शिंदेच्या दसरा मेळाव्यामुळे मुंबईत वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग कोणते?

Dasara Melava : मुंबईत दसऱ्याच्या निमित्ताने अनेक पक्षांचे मेळावे होणार आहेत. यामुळे मुंबईत दसऱ्याच्या दिवशी वाहतुकीत बदल करण्यात आले आहे. या बदलांबाबत वाहतूक पोलिसांनी माहिती दिली आहे.
Dasara Melava
Dasara Melavax
Published On
Summary
  • मुंबईत दसऱ्याच्या दिवशी राजकीय मेळावे असल्याने वाहतुकीत बदल झाले आहेत.

  • मेळाव्यामुळे काही मार्ग बंद राहणार आणि काही मार्गांमध्ये बदल केले गेले आहेत.

  • पोलिसांनी गर्दी टाळण्यासाठी पर्यायी मार्गांची माहिती दिली आहे.

Shivsena Dasara Melava Mumbai Traffic : नवरात्रौत्सवाचे अवघे काही दिवस उरले आहे. नवरात्रीनंतर येत्या गुरुवारी २ ऑक्टोबर रोजी दसरा म्हणजेच विजयादशमी हा सण साजरा केला जाणार आहे. दसऱ्याच्या निमित्ताने अनेकजण नातेवाईकांना भेटायला म्हणून जातात काहीजण सुट्टी असल्याने घराबाहेर पडतात. पण दसऱ्याच्या दिवशी मुंबईत अनेक पक्षांचे दसरा मेळावे असतात. यंदा छत्रपती शिवाजी महाराज पार्क, दादर येथे शिवसेना ठाकरे गटाचा आणि आझाद मैदानावर शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने २ ऑक्टोबर रोजी मुंबईत अनेक मार्गात बदल करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी प्रवेश बंदी असणार आहे. मेळाव्यामुळे मोठ्या संख्येने मुंबईत गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांची खबरदारी म्हणून वाहतुकीत बदल केले आहेत. यासंबंधित माहिती वाहतूक पोलीस विभागाने दिली आहे.

Dasara Melava
मोठी राजकीय उलथापालथ होणार, आगामी निवडणुकीत महायुती अन् महाविकास आघाडीही फुटणार, संकेत मिळाले

वाहने उभी करण्यास प्रतिबंध असलेले रस्ते -

  • १. स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते एस बँक सिग्नल)

  • २. केळूस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), दादर.

  • ३. एम. बी. राऊत मार्ग, (एस. व्ही. एस. रोड) दादर.

  • ४. पांडुरंग नाईक मार्ग, (एम. बी. राऊत रोड) दादर

  • ५. दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक) दादर

  • ६. ⁠दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ५ ते शितलादेवी रोड) दादर.

  • ७. एन. सी. केळकरमार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), दादर

  • ८. एल.जे. रोड, राजा बडे जंक्शन ते गडकरी

Dasara Melava
BJP Leader Passes Away : भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे निधन, एम्स रुग्णालयात घेतला शेवटचा श्वास

वाहनांना प्रवेश बंदी असलेले मार्ग व पर्यायी मार्ग -

१. स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धी विनायक मंदीर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन)

पर्यायी मार्ग - सिध्दिविनायक मंदिर जंक्शन, एस. के. बोले रोड, आगार बाझार, पोतुर्गीज चर्च, गोखले रोड या रस्त्याचा वापर करावा.

२. राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्करमार्ग उत्तर जंक्शन येथपर्यंत.

पर्यायी मार्ग - एल. जे. रोड, गोखले रोड-स्टिलमॅन जंक्शन वरून पढे गोखले रोड चा वापर करतील.

३. दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथुन दक्षिण वाहीनी.

पर्यायी मार्ग - राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.

४. गडकरी चौक येथुन केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर.

पर्यायी मार्ग - एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.

Dasara Melava
Bollywood Actor Arrest : मोठी बातमी! बॉलिवूड अभिनेत्याला अटक, ३५ कोटींचे कोकेन जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com