Mumbai Crime
Mumbai Crime Saamtv

Mumbai Crime News: लग्नाचे आमिष दाखवून महिलेकडून तब्बल साडेबारा लाख उकळले; दोघांना अटक

दोघांकडून माटुंगा पोलिसांनी आठ डेबिट कार्ड, सात चेकबुक, एक राऊटर आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.
Published on

सचिन गाड, मराठी...

Mumbai Crime News: ७५ वर्षीय महिलेस लग्नाचं आमिष दाखवून तब्बल साडेबारा लाख रुपयांना फसवल्याप्रकरणी माटुंगा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. या दोघांसह त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून महिलेस जर्मन नागरिक असल्याचे भासवून लग्नाची स्वप्न दाखवली आणि त्यानंतर त्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

या प्रकरणी थिंग्यो रिंगफामी फेलरे व सोलन थुंगामल अंगकांग नावाच्या दोघांना माटुंगा पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेतील मुख्य सूत्रधार मात्र अद्याप फरार आहेत. (Latest Crime News)

Mumbai Crime
Chhatrapati Sambhaji Raje News: होय, मी मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत! छत्रपती संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, नोव्हेंबर महिन्यात ख्रिस पॉल नावाच्या इसमाने व्हाट्सअपवर महिलेशी संपर्क केला आणि आपण जर्मन नागरिक असल्याचा बनाव केला. त्यानंतर त्याने महिलेला लग्नाची स्वप्न दाखवली आणि विश्वास संपादन केला. त्यानंतर या तोतया पॉलने महिलेसाठी गिफ्ट कार्ड पाठवण्याचा बनाव करत हे गिफ्ट कार्ड कस्टमर क्लिअरन्समध्ये अडकल्याचा दावा करत महिलेकडून तीन लाख 85 हजार ड्युटीच्या नावाखाली उकळले.(Crime News)

एवढ्यावरच न थांबता काही दिवसात या तोतया पॉलने आपण लंडनवरून दिल्ली विमानतळावर उतरलो आहोत तसेच आपल्याकडे जास्त कॅश (रोकड) असल्याने आपल्याला कस्टम अधिकाऱ्यांनी रोखले असल्याचा बनाव केला. यावेळी कस्टम अधिकाऱ्यांना देण्याच्या नावाखाली महिलेकडून तब्बल आठ लाख 78 हजार रुपये उकळण्यात आले.

Mumbai Crime
Maharashtra Politics: काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी ऑफर दिली तरी पंकजा मुंडे कुठेही जाणार नाहीत - रावसाहेब दानवे

जोवर महिलेला हा सगळा बनाव असल्याचं समजलं तोवर त्या बारा लाख 63 हजार रुपये गमावून बसल्या होत्या. आरोपी नोएडा आणि दिल्लीत राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर माटुंगा पोलिसांनी त्यांना अटक केली. दोघांकडून माटुंगा पोलिसांनी आठ डेबिट कार्ड, सात चेकबुक, एक राऊटर आणि दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

दोघांना सात जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक झाली असली तरी मुख्य सूत्रधार जो नायजेरियन नागरिक असल्याचं सांगितल जातय तो मात्र अद्याप फरार आहेत. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com