
Chhatrapati Sambhaji Raje Latest News: नाशिकमध्ये बोलताना स्वराज्य संघटनेचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे. काही पदाधिकारी तुमचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा करत आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर उत्तर देताना संभाजीराजे यांनी हे वक्तव्य केले आहे.
पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना संभाजीराजे म्हणाले, "कोणाला काय बोलायचं असेल तर ते बोलतील. माझं काम करण्याची पद्धत तुम्ही पाहिलं तर शेवटच्या घटकापर्यंत जायला पाहिजे, स्वराज्यचं महत्त्व समजून द्यायला हवं. आपल्याला सुसंस्कृत महाराष्ट्र घडवायचा आहे."
"सध्या राज्याचं राजकारण ज्या खालच्या पातळीला गेलं आहे. हे बोलण्यासाठी मी सज्ज आहे. त्यामुळे होय मी शर्यतीत आहेच, तो निर्णय काही लगेच होणार नाही. पण त्यासाठीच मी येथे आलो. माझी तब्बेत ठिक नसतानाही मी लोकांना भेटतोय याचा अर्थच तो आहे", असे संभाजीराजे म्हणाले. (Marathi Tajya Batmya)
आमचे सर्व कार्ड ओपन...
यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले, लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्ही मजबूत हवेत. या उद्देशाने विरोधक एकत्र येत असतील आणि त्यामुळे विरोधीपक्ष मजबूत होत असेल तर त्यांच स्वागत आहे. स्वराज्य संघटनेचा स्वतंत्र लढण्याचा उद्देश आहे. मात्र त्यावेळी समविचारी एकत्र आले तर आमचे सर्व कार्ड ओपन आहे असे देखील यावेळी बोलताना संभाजीराजे म्हणाले. (Latest Political News)
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय...
स्वराज्य संघटनेच्या कार्यक्रमाविषयी बोलताना संभाजीराजे म्हणाले, स्वराज्य संघटनेचा राज्यवापी कार्यक्रम झाला. स्वराज्य संघटनेची भूमिका आणि हेतू ठरवण्यात आला. सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय. लोकांचा माझ्यावर किती विश्वास आहे, हे पाहायला पाहिजे. मला यापूर्वी फटका बसला आहे, तो इतिहास झाला. मला त्यावर बोलायचे नाही. मला त्या फटक्याचा फायदा झाला, त्यामुळेच मी महाराष्ट्रात फिरतोय. नाशिक आणि नांदेडमधून लोकांची मागणी आहे, असे संभाजीराजे म्हणाले. (Latest Marathi News)
Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.
साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.