Mumbai Crime News: मुंबई हादरली! मुंब्रा रेतीबंदर परिसरात बेवारस बॅग दिसली; उघडून बघताच पोलिसही चक्रावले

Mumbai Crime News: मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात काही नागरिकांना एक बेवारस बॅग दिसून आली. या बॅगेतून घुमट असा वासही येत होता.
Mumbai Crime News
Mumbai Crime NewsSaam TV

संजय गडदे, साम टीव्ही

Mumbai Crime News: मुंब्रा येथील रेतीबंदर परिसरात काही नागरिकांना एक बेवारस बॅग दिसून आली. या बॅगेतून घुमट असा वासही येत होता. सुरूवातीला काही नागरिकांना बॅगेत कुणी कचरा भरून फेकला असेल, असं वाटलं.

मात्र, त्याशेजारी रक्ताचे डाग दिसून आल्याने त्यांनी तातडीने पोलिसांना फोन केला. माहिती मिळातच पोलीस हजर झाले. पोलिसांनी या बॅगेची तपासणी केली असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. (Breaking Marathi News)

Mumbai Crime News
Jalgaon News: झोक्यातून बाळ पडू नये म्हणून आईने काळजीपोटी रुमाल बांधला; फास लागल्याने अनर्थ घडला

या बेवारस बॅगेत एका महिलेचा मृतदेह कपड्यात गुंडाळून सेलो टेप ने पॅक केल्याची खळबजनक घटना समोर आली आहे. सदर महिलेचा आढळलेला मृतदेह पाहून या महिलेची हत्या झाली असावी असा अंदाज पोलिसांनी वर्तवली आहे.

मुंब्रा (Mumbai Crime News) येथील रेतीरेतीबंदर परिसरात महिलेचा कपड्यात आढळलेला मृतदेह हा दोन ते तीन दिवस जुना असल्याचे सांगण्यात येत आहे. त्या महिलेची हत्या केल्यानंतर तिला कपड्यात गुंडाळून त्याला सेलोटेप गुंडाळून कोणालाही संशय येऊ नये असा पॅक करण्यात आला होता.

Mumbai Crime News
Wardha Accident News: साडीचा पदर बाइकच्या चेनमध्ये अडकून मायलेकी रस्त्यावर पडल्या, पाठीमागून टँकर आल्यानं अनर्थ घडला

आतापर्यंत मृत महिलेची ओळख पटलेली नाही. स्थानिक लोकांना प्रथम कचरा असल्याचे समजले. मात्र त्यातून दुर्गंध आल्यानंतर पोलिसांना (Police) पाचारण करण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी घेऊन पाहणी केली असता त्या कपड्यात एका महिलेचा मृतदेह आढळून आला.

दरम्यान, मृत महिलेचे वय अंदाजे 20 ते 25 वर्षे असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतदेह सापडलेल्या ठिकाणी फॉरेन्सिक (Crime News) टीमलाही पाचारण करण्यात आले. प्रकरणाचा पुढील तपास मुंब्रा पोलीस करत आहेत. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com