मुंबई पोलिसांची मोठी कारवाई; तब्बल 2.60 कोटी रुपयांची व्हेल माशाची उलटी जप्त

25 वर्षीय आरोपी हा दापोलीचा रहिवासी आहे.
Whale Vomit Mumbai Crime
Whale Vomit Mumbai CrimeSaam TV
Published On

मुंबई : मुंबईत (Mumbai) व्हेल माशाची उलटी (Whale Vomit) विक्री करणाऱ्या आरोपीला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी (Police) अटक केली आहे. पोलिसांनी सापळा रचून संशयितास अटक केली आणि 2.616 किलो वजन असलेली 2 कोटी 60 लाख रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त केली. 25 वर्षीय आरोपी हा दापोलीचा रहिवासी आहे. (Mumbai Crime News)

Whale Vomit Mumbai Crime
आदित्य ठाकरे भर पावसात भिजले, फिरले अन् कडाडले; म्हणाले, शिंदे सरकार...

पोलिसांना एक इसम व्हेल माशाची उलटीघेऊन ती विक्री करण्याचे उद्देशाने ऑबेरॉय हॉटेल समोर, येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वन विभागाचे अधिकारी व पोलीस अधिकारी यांच्या संयुक्त पथकातर्फे ऑबेरॉय हॉटेलसमोर परिसरात पाळत ठेवण्यात आली.

काही वेळाने गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीप्रमाणे एका संशयित इसमास हटकले असता त्याच्या ताब्यात प्रतिबंधित केलेला वेल माशाची उलटी म्हणजेच एम्बरग्रीस हा पदार्थ मिळून आला. त्याची वन अधिकारी यांनी पाहणी करून खात्री केली असता त्याचे एकूण वजन 2.619 ग्रॅम असल्याचे व त्याची किंमत 2 कोटी 60 लाख रुपये असल्याची समजले. (Mumbai Police News)

Whale Vomit Mumbai Crime
आढळराव पाटलांचे हातपाय तोडण्याची धमकी; १५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

सदर आरोपीला मरीन ड्राईव्ह पोलिसांनी अटक केली असून अधिक तपास पोलीस करत आहे. या पदार्थाचा वापर उच्च दर्जाचे सुगंधित द्रव्यामध्ये करण्यात येत असून महारष्ट्र शासनाने या पदार्थांच्या विक्रीवर कायदेशीर बंदी घातली आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com