आदित्य ठाकरे भर पावसात भिजले, फिरले अन् कडाडले; म्हणाले, शिंदे सरकार...

शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच, असं भाकीत शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केलं.
Aditya thackeray
Aditya thackeray saam tv

सुमित सावंत

मुंबई : तुम्हाला जायचं होतं तर जा, सुखी राहा, आमच्या मनात हृदयात तुमच्याबद्दल वाईट नाही. आमच्या मनात अजून वाईट नाही, म्हणून तुमच्या समोर उभे आहोत. तिकडे गेला आहात. मात्र, आमच्या शिवसैनिकांना का त्रास देत आहात ? लपून छपून हल्ले सुरू आहेत, ते योग्य नाही. काही लोकांना पळवून नेलं आहे. पण जिंकणार आपणच आहोत. कारण आपण कायद्याच्या बाजूने आहोत. त्यामुळे हे शिंदे सरकार पडणार म्हणजे पडणारच, असं भाकीत शिवसेना नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी व्यक्त केलं. (Aditya Thackeray News In Marathi )

Aditya thackeray
मी आज मुख्यमंत्री नसलो, तरी...; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले

आमदार आदित्य ठाकरे यांची आज निष्ठा यात्रा आज शिवसेनेच्या बंडखोर आमदार यामिनी जाधव यांच्या भायखळा मतदार संघात आयोजित करण्यात आली आहे. भायखळ्यातील आगरीपाडा शाखेच्या पदाधिकाऱ्यांना आदित्य ठाकरेंनी संबोधित केले. या निष्ठा यात्रेसाठी शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना शाखेसमोर जमले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला.

Aditya thackeray
संजय राऊतांची ईडीने विनंती फेटाळली; 'या' दिवशी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश

आदित्य ठाकरे म्हणाले, 'गेल्या महिन्याभरात महाराष्ट्रात सर्कस सुरू आहे. पण हे का होतंय ते कळत नाही. इथे येत असताना जुन्या आठवणी जाग्या झाल्या. वाईट वाटतं, ज्या लोकांवर विश्वास ठेवून पद ताकद दिली. तुम्ही मतदान व्यक्ती की पक्ष म्हणून केलं ? ज्याला आपण मतदान केलं तो शिवसैनिक म्हणून काम करेल अशी अपेक्षा होती. एक महिन्यांपासून आरोप- प्रत्यारोप सुरू आहेत. आता राग येण्यापेक्षा दु:ख होतं. ते पाठीत खंजीर खूपसून गेले'.

'शिवसेना (Shivsena) संपवण्याचा प्रयत्न करू लागलेत, काय आम्ही तुमचं वाईट केलं ? गेल्या अडीच वर्षात जाती-धर्मात वाद झाले नाहीत. कोविड काळात महाराष्ट्र मॉडेल प्रसिद्ध झालं. आरे वाचवलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगलं काम केलं, असं सगळं सांगत होते. ज्यांना आपण काही देत नाही, ते आपल्या सोबत राहतात. पण ज्यांना आपण देतो, त्यांना अपचन होतं.

आपण कुठेही विरोधी पक्षाच्या कुठल्याही आमदाराला नोटीस पाठवत नव्हतो. मी चूक मान्य करतो, राजकारण आपल्याला जमलं नाही. म्हणून आपलं सरकार गेलं. त्यांचे अजून फोडण्यासाठी पदाधिकाऱ्यांना फोन सुरू आहेत, आमच्याकडे या म्हणून पण आपण थांबलो नाही, समाजकारण सुरू आहे', असे आदित्य ठाकरे म्हणाले.

Aditya thackeray
वचपा घेवू, त्याची काळजी करू नका; हल्ल्यानंतर जखमी पालांडेंना उद्धव ठाकरेंचा फोन

'मुंबईला आपण महत्व देण्याचा प्रयत्न केला. जे इतर कोणत्याही सरकारने अद्याप दिलं नव्हतं. सगळे म्हणतात, राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं, पण ही जबाबदारी घेत आहे. जगाला सांगण्यासाठी की चांगल्या लोकांना राजकारणात स्थान असतं. गद्दारांनी कितीही गट केले, नावं लावली. तरी गद्दार ते गद्दारच राहणार. आम्ही कधीही विधान भवनात कधी गेलो नव्हतो, पण गेल्यावर यांचे धंदे आम्ही बघितले. म्हणून त्यांच्या पोटात दु:खत असावं', असेही ते म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com