वचपा घेवू, त्याची काळजी करू नका; हल्ल्यानंतर जखमी पालांडेंना उद्धव ठाकरेंचा फोन

हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कल्याण शहरात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या घटनेनंतर जखमी पालांडे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फोन करत तब्येतीची चौकशी करत धीर दिला आहे.
kalyan News
kalyan News saam tv
Published On

कल्याण : कल्याण उपशहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर आज सकाळच्या सुमारास काही अज्ञात व्यक्तींनी तलवार आणि रॉडने हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात पालांडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हर्षवर्धन पालांडे हे उद्धव ठाकरे समर्थक असून त्यांनी शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप केला आहे. हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कल्याण (Kalyan) शहरात राजकीय वातावरण चांगलच तापलं आहे. या घटनेनंतर जखमी पालांडे यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी फोन करत तब्येतीची चौकशी करत धीर दिला आहे. (Uddhav Thackeray News In Marathi )

kalyan News
आढळराव पाटलांचे हातपाय तोडण्याची धमकी; १५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

कल्याण मधील उप शहर प्रमुख हर्षवर्धन पालांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर कल्याण शहरात खळबळ उडाली आहे. पालांडे यांनी हा हल्ला शिंदे समर्थक माजी नगरसेवक महेश गायकवाड यांच्या सहकाऱ्यांनी केल्याचा आरोप केला. तर गायकवाड यांनी मात्र या आरोपांचे खंडन केलं आहे . सध्या पालांडे यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून कोळशेवाडी पोलिस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

आज पालांडे यांना उद्धव ठाकरे यांचा फोन आला. ठाकरे यांनी पालांडे यांच्या तब्येतीची चौकशी करत त्यांना धीर दिला. यावेळी ठाकरे यांनी त्याचा वचपा घेवू, त्याची काळजी करू नका. आधी तुम्ही एकदम व्यवस्थित व्हा, मी येईन भेटायला, असं उद्धव ठाकरेंनी पालांडे यांना सांगितलं.

kalyan News
ओबीसी आरक्षणासाठीची लढाई आज यशस्वी करुन दाखवली - अजित पवार

हल्ल्यानंतर जखमी हर्षवर्धन पालांडे यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी पालांडे म्हणाले, 'नेहमीप्रमाणे कामाला जात होतो, हल्लेखोरांनी माझी गाडी अडवली. माझ्या वाहनाच्या दोन्ही बाजूने गाडी लावण्यात आली. त्यानंतर तलवार आणि रॉडने हल्ला केला. त्यावेळी थोडा पळालो.

मला हाताला आणि पायाला मार लागला. शिवसेनेचे काम पुढं पुढं येऊन करतो, म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. महेश गायकवाडला पोलिसांचं संरक्षण आहे. त्यांचे समर्थक दहशत निर्माण करत आहे. दहशत निर्माण करून शिवसेनेवर दबाव निर्माण करत असाल, तर शिवसैनिक दबावाला बळी पडणार नाही'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com