आढळराव पाटलांचे हातपाय तोडण्याची धमकी; १५ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

राजगुरूनगर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
Shivajirao Adharao Patil
Shivajirao Adharao PatilSaam TV
Published On

पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयानंतर शिरूर मतदारसंघातील शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले. आज शिवसैनिकांनी आढळराव यांच्याविरोधात आंदोलनही केलं. दरम्यान, यावेळी काही शिवसैनिकांनी आढळराव पाटलांचे हातपाय तोडण्याची धमकीही दिली. त्यामुळे त्यांच्यावर राजगुरूनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Shivajirao Adharao Patil Latest News)

Shivajirao Adharao Patil
आम्ही उद्धव ठाकरेंना सोडणार नाही; शेकडो शिवसैनिकांनी बॉण्ड पेपरवर दिले वचनपत्र

एकनाथ शिंदे यांच्यासह 40 हून आमदारांनी बंड केल्यानंतर आताशिवसेनेचे इतरही नेते शिंदे गटात सामील होत आहेत. पुण्यात शिवसेनेला शिवसेनेला खिंडार पडलं असून मावळचे खासदार श्रीरंग बारणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे सुद्धा शिंदे गटात सामील झाले आहेत. अशातच आढळराव पाटील यांच्याविरोधात मतदारसंघातील शिवसैनिक आक्रमक झाले. शिवसैनिकांनी घोषणा देत पुणे-नाशिक महामार्गावर आंदोलन केलं.

शिवसेनेतील फुटीनंतर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यावर गद्दार-गाढव असं लिहीत निषेध व्यक्त केला. तसंच आम्ही यापुढेही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेशी एकनिष्ठ असल्याचंही या शिवसैनिकांनी म्हटलं आहे. यावेळी शिवसैनिकांकडून आढळराव पाटलांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले.

Shivajirao Adharao Patil
शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराबाबत CM एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान, म्हणाले...

दरम्यान, शिवसैनिकांनी आढळराव पाटील यांची बदनामी होईल असे कृत्य केले. त्यांना अश्लिल भाषेत शिवीगाऴ करुन लांडेवाडी येथील घरी येऊन हात पाय तोडण्याची धमकी दिली. अशी तक्रार अंकुश शेवाळ यांनी पोलिसांत दिली. त्यांच्या तक्रारीवरून राजगुरुनगर पोलिसांनी माजी जिल्हाप्रमुख राम गावडे माजी तालुकाध्यक्ष गणेश सांडभोर यांच्यासह १५ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com