Mumbai News: १२ वर्षांचा मुलगा खेळता खेळता हरवला; पोलिसांनी QR कोडच्या मदतीने हुशारीने शोधला घराचा पत्ता

Police Traced Missing Boy With QR code: कुलाबा पोलिसांनी QR कोडच्या मदतीने एका १२ वर्षीय हरवलेल्या मुलाचा शोध लावला आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधला आहे.
Mumbai Police
Mumbai NewsSaam Tv
Published On

सचिन गाड साम टीव्ही, मुंबई

कुलाबा पोलिसांनी QR कोडच्या मदतीने एका १२ वर्षीय हरवलेल्या मुलाचा शोध लावला आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी (Mumbai Colaba Police) मुलाच्या पालकांशी संपर्क साधला आहे. आठ तासातच मतिमंद मुलाचं त्याच्या पालकांशी पुनर्मिलन झालं आहे. कुलाबा पोलिसांना डॉ. शामाप्रसाद मुखर्जी चौकात रात्रीच्या सुमारास एक मतिमंद सापडला (Mumbai News) होता.

परंतु हा मुलगा मतिमंद असल्यामुळे तो त्याचं नाव आणि पत्ता सांगण्यात असमर्थ होता. पोलिसांनी त्या मुलाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. त्याच्या तपासणीमध्ये पोलिसांना त्या मुलाच्या (Police Traced Missing Boy With QR code) गळ्यातील पेंडटमध्ये QR कोड सापडला होता. त्या QR कोडच्या आधारे पोलिसांनी या मुलाची माहिती शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

हा QR कोड स्कॅन केला असता त्यांना प्रोजेक्ट चेतना डॉट इनची मिळाली (QR code) माहिती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी मुलाच्या पालकांशी संपर्क साधला. त्यांनी त्याला त्याच्या पालकांच्या स्वाधीन केलं. केवळ आठ तासांमध्ये या हरवलेल्या १२ वर्षीय मुलाची त्याच्या पालकांसोबत भेट झाली आहे. या मुलाला त्याच्या घरापर्यंत पोहोचवण्याची उल्लेखनीय कामगिरी कुलाबा पोलिसांनी केली आहे.

आपण दिवसातून कितीतरी वेळा QR कोडद्वारे पेमेंट करतो. परंतु हा QR कोड एखाद्याचा जीव वाचवू शकतो किंवा हरवलेल्या मुलाला त्याच्या कुटुंबात परत येण्यास मदत करू शकतो, अशी कधी कल्पना देखील केलेली (Police Traced Missing Boy) नव्हती. पण अशीच आश्चर्यकारक घटना मुंबईमध्ये घडली आहे. क्यूआर कोड लॉकेटच्या मदतीने एक मतिमंद मुलगा सुखरूप घरी पोहोचला आहे.

Mumbai Police
Pune Police: पुण्यातील 85 'VIP' राजकारण्यांची सुरक्षा काढली; पुणे पोलीस आयुक्तांचा निर्णय, काय आहे कारण?

'आज तक'सोबत या लॉकेटबद्दल बोलताना डेटा अभियंता अक्षय रिडलान म्हणाले की, हरवलेल्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी हे एक नाविन्यपूर्ण लॉकेट (Missing Boy) आहे. एखादी व्यक्ती बेपत्ता झाल्यास, या लॉकेटमधील स्कॅनरच्या मदतीने त्यांच्या कुटुंबातील सदस्यांशी संपर्क साधला जाऊ शकतो. त्यामुळे या व्यक्तींचा पत्ता शोधण्यास मदत होते.

Mumbai Police
MP Police Viral Video : FIR नोंद करायला महिना लावला; हताश पीडित महिलेने पोलीस ठाण्यातच अधिकाऱ्याची केली आरती, पाहा Video

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com