Pune Police: पुण्यातील 85 'VIP' राजकारण्यांची सुरक्षा काढली; पुणे पोलीस आयुक्तांचा निर्णय, काय आहे कारण?

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. पोलिसांनी शहरातील ८५ प्रतिष्ठितांची सुरक्षा काढली आहे.
Police Commissioner Amitesh Kumar
Police Commissioner Amitesh KumarSaam Tv
Published On

अक्षय बडवे

Pune Police Removes Political Activist Security

पुणे पोलिसांनी (Pune Police) शहरातील एकूण ११० जणांना पोलीस सुरक्षा पुरवली होती. त्यापैकी ८५ जणांची पोलीस सुरक्षा काढण्यात आली आहे. त्यासोबत अनावश्यक अशा शहरातील २३ ठिकाणांवरील देखील सुरक्षा गार्ड काढण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Police Commissioner Amitesh Kumar) यांनी हा निर्णय घेतला आहे.  (Latest Crime News)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील विविध राजकीय पक्षांचे राष्ट्रीय स्थरावर असलेले अध्यक्ष, प्रमुख तसेच नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांची सुरक्षा काढण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्था काढल्यानंतर पुणे शहरातील राजकीय वर्तुळात एकच खळबळ (Removes Security Of Political Activist) उडाली होती.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षक

पुणे शहरात एकूण ११० लोकांना राजकीय सुरक्षा पुरविण्यात आली होती. त्यापैकी ८५ लोकांची सुरक्षा काढली आहे. पोलीस आयुक्तांच्या या निर्णयामुळे तब्बल ३५० पोलीस कर्मचारी हजर झाले (Political Activist Security) आहेत. परिणामी याचा फायदा पोलिसींगसाठी होणार आहे. महत्त्वाच्या संवेदनशील ठिकाणी सुरक्षा रक्षक कायम ठेवण्यात आले आहेत.

जास्त आवश्यकता नसलेल्या २३ ठिकाणांचे सुरक्षा रक्षक हटवले गेले आहेत. पुणे पोलिसांकडे ५४ जणांनी पोलीस सुरक्षा पुरवावी, अशा प्रकारचे अर्ज केले होते. यासंबंधित अर्ज देखील रद्द करण्यात आलेले (Lok Sabha Election 2024) आहे. ज्या व्यक्तींकडे कायदेशीर खासगी पिस्तूल आहेत, त्यांच्याकडून पिस्तूल जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

Police Commissioner Amitesh Kumar
Pune Police: पुण्यात हुक्का पार्लर बंद होणार; बार, पब, रेस्टॉरंटला वेळेचं बंधन, अमितेश कुमार यांचा निर्णयांचा धडाका

गुन्हेगारी संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू

मागील काही दिवसांत पुणे शहरातील गुन्हेगारी वाढली आहे. तसंच पुणे शहरात वर्षानुवर्ष प्रलंबित असलेले १६ हजार गुन्हे आहेत. त्यांना तातडीने संपविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू करण्यात आले (Lok Sabha 2024) आहेत. तीन महिन्यापेक्षा अधिक गुन्हे असलेल्या प्रलंबित गुन्ह्यांची संख्या १२ ते १३ हजार आहेत. हे गुन्हे तातडीने मार्गी लावण्यासाठी तक्रारदारांशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.

Police Commissioner Amitesh Kumar
Pune Police Transfer: ऐन निवडणुकीच्या तोंडावर पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या, आयुक्तांचे रात्री उशिरा आदेश

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com