Coastal Road : मुंबईकरांसाठी गुडन्यूज! वीकेंडलाही कोस्टल रोड राहणार खुला, पण 'या' वाहनांना प्रवेश बंद

Mumbai Coastal Road Latest Update : मुंबईकरांसाठी खुशखबर आहे. कोस्टल रोड आता प्रवासासाठी शनिवार आणि रविवारी देखील सुरू राहणार आहे.
कोस्टल रोड
Coastal Road Saam Tv
Published On

मुंबई : कोस्टल रोडच्या उत्तरेकडे जाणाऱ्या कॅरेजवेवरील प्रवासाचे तास एका तासाने वाढवले ​​गेले आहेत, तसंच हा मार्ग आठवड्याच्या शेवटी देखील प्रवासासाठी खुला असणार आहे, असं बीएमसीने शुक्रवारी जाहीर केलंय. त्यामुळे आता नवीन वेळेसह वाहनचालकांना मरीन ड्राइव्हवरून कोस्टल रोडवर आठवड्याचे सातही दिवस प्रवास करता येणार आहे. दिवसात १७ तास प्रवास करता येणार असल्याची माहिती मिळतेय.

कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग वांद्रे-वरळी सी-लिंकला जोडल्यानंतर आता आठवड्यातील सर्व दिवस नागरिकांना या मार्गाचा वापर करता येणार आहे. बीएमसी कोस्टल रोड विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ही सुविधा चालकांसाठी २१ सप्टेंबरपासून उपलब्ध होणार (Mumbai Coastal Road Latest Update) आहे. आता सकाळी ७ ते मध्यरात्री १२ पर्यंत कोस्टल रोडचा वापर करता येणार आहे. पूर्वी हा मार्ग सकाळी ७ ते रात्री ११ या वेळेतच वाहनांसाठी खुला होता. आतापर्यंत शनिवार आणि रविवारी वाहनांना प्रवास करण्यास बंदी होती.

मुंबईकरांसाठी खुशखबर

कोस्टल रोडचा दक्षिणेकडील भाग बिंदू माधव चौक, रजनी पटेल चौक, लोटस जंक्शन आणि अमर सन्सपासून मरीन ड्राइव्हपर्यंत विस्तारलेला आहे. उत्तरेकडील भाग मरीन ड्राइव्ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक ते वांद्रे वरळी सी (Mumbai Coastal Road) लिंकपर्यंत आहे. १२ सप्टेंबर रोजी कोस्टल रोडचा दक्षिण भाग सी-लिंकला जोडण्यात आला होता. त्यामुळे १३ सप्टेंबरपासून कोस्टल रोडच्या उत्तरेकडील भागातून सी-लिंकद्वारे लोक वांद्रेला पोहोचता येणार आहे. कोस्टल रोड आणि सी-लिंकची जोडणी झाल्यामुळे वरळीतील बिंदू माधव चौकातील वाहतूककोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोस्टल रोड
Mumbai Costal Road च्या कामाची Eknath Shinde व Devendra Fadnavis यांच्याकडून पाहणी

कोस्टल रोडचं काम

बीएमसी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत कोस्टल रोडचे काम ९२ टक्के पूर्ण झालंय. डिसेंबरपर्यंत कोस्टल रोड मुंबईकरांसाठी पूर्ण क्षमतेने खुला होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. कोस्टल रोडचे काम ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू झाले होती. १०.५८ किमी लांबीच्या कोस्टल रोड अंतर्गत, मलबार हिल टेकडी आणि समुद्राच्या खाली बांधलेला २.०७ किमी लांबीचा समांतर बोगदा (Coastal Road) आहे. कोस्टल रोडचे संपूर्ण काम डिसेंबर २०१४ पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. त्यानंतर १०.५८ किमी लांबीचा कोस्टल रोड मरीन ड्राइव्हपासून वांद्रे-वरळी सी लिंकला पूर्णपणे जोडला जाईल.

मार्गावर थांबण्यास मनाई

सरळ रस्त्यावर वाहनांची वेगमर्यादा ८० किमी, बोगद्यात ६० किमी आणि वळणाच्या ठिकाणी ४० किमी आहे. वाहतूक पोलिसांनी बेस्ट आणि एसटी बसेस वगळून सर्व अवजड वाहने, ट्रॅक्टर, अवजड मालाची वाहने आणि प्रवासी वाहतूक करणारी वाहने, (Mumbai News) मालवाहतूक करणारी वाहने, दुचाकी, सायकल, तीनचाकी, जनावरे ओढलेल्या गाड्या, हातगाडी यांना प्रवेशबंदी केलीय. जे वाहनचालक आणि प्रवासी फोटो आणि व्हिडिओ घेण्यासाठी कोस्टल रोडवर त्यांची वाहने थांबवतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं अतिरिक्त पोलीस आयुक्तांनी दिलेल्या अधिसूचनेत म्हटलंय.

कोस्टल रोड
Mumbai Costal Road: कोस्टल रोडवरुन उद्घाटनानंतर २४ तासांत किती वाहनांनी केला प्रवास? आकडेवारी आली समोर

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com