पैसे देण्यास नकार, नवऱ्यानं थेट गळाच पकडला; बायकोसोबत भयंकर घडलं | MUMBAI

Financial Dispute Turns Deadly: पैशांच्या कारणावरून वाद; नवऱ्यानं बायकोचा गळा आवळला, पत्नीनं जागीच सोडले प्राण. चारकोपमध्ये खळबळ.
Mumbai Charkop Crime
Mumbai Charkop CrimeSaam
Published On
Summary
  • पैशांच्या कारणावरून वाद.

  • पतीनं पत्नीचा गळा आवळला.

  • महिलेचा जागीच मृत्यू.

मुंबईच्या चारकोपमधून एक भयंकर घटना समोर आली आहे. पैशांच्या वादातून पतीनं पत्नीची गळा आवळून हत्या केली आहे. ही घटना २० सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. तसेच आरोपी पतीला ताब्यात घेतलं. सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि त्याची पत्नी चारकोपमध्ये राहत होते. दसा राणा असे आरोपीचे नाव आहे. तर, मृत पत्नीचे नाव हिमेंद्र असे होते. दसा राणा हा एका गृहनिर्माण सोसायटीतील बांधकाम साईटवर मजुर म्हणून काम करीत होता. घटनेच्या दिवशी त्याचे पत्नीसोबत भांडण झाले.

Mumbai Charkop Crime
खवय्यांना धक्का! मासळीच्या किमतीत वाढ, कारण ठरलंय बर्फ, किती रूपयांनी होणार वाढ?

गावाला जाण्यासाठी त्याने पत्नीकडे पैसे मागितले. मात्र, तिनं नकार दिला. पत्नीनं पैशांसाठी नकार देताच पतीला राग अनावर झाला. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. संतापाच्या भरात दसा राणाने पत्नीला मारहाण करण्यास सुरूवात केली. तसेच तिचा गळा आवळून खून केला.  मृत महिलेची ओळख हिमेंद्री राणा अशी असून, ती बालांगीर (ओडिशा) जिल्ह्यातील रहिवासी होती.

Mumbai Charkop Crime
ओबीसींचे अनेक दाखले बोगस, उपसमिती फक्त नावालाच; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सरकारवर बरसले

या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेचं गांभीर्य लक्षात घेत तपासाला सुरूवात केली. या प्रकरणी चारकोप पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास करून आरोपीला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिसांकडे करीत आहेत.

Mumbai Charkop Crime
मराठीचा आग्रह असणाऱ्या मनसे नेत्याच्या हॉटेलमध्ये परप्रांतीय आचारी; भाजपकडून ट्रोल | VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com