Central Railway : मुंबईतील लोको पायलटचा मोठा निर्णय, सामूहिक स्वेच्छानिवृत्ती घेणार, पण कारण काय ?

Mumbai Central Railway News : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोको पायलट कर्मचाऱ्यांनी निकृष्ट अन्न, असुरक्षित सुविधा आणि तणावपूर्ण कामाच्या वातावरणाविरोधात सामूहिक स्वेच्छानिवृत्ती अर्ज सादर केला आहे. सीएसएमटी DRM यांच्याकडे संयुक्त निवेदन देत गंभीर तक्रारी मांडण्यात आल्या आहेत.
Central Railway : मुंबईतील लोको पायलटचा मोठा निर्णय, सामूहिक स्वेच्छानिवृत्ती घेणार, पण कारण काय ?
Mumbai Central Railway NewsSaam Tv
Published On
Summary
  • मध्य रेल्वे मुंबई विभागातील लोको पायलटांचा सामूहिक VRS अर्ज

  • निकृष्ट अन्न व असुरक्षित सुविधांबाबत गंभीर तक्रारी

  • सीएसएमटी DRM यांच्याकडे संयुक्त निवेदन सादर

  • रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण

संजय गडदे, मुंबई

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील लोको पायलट (मेल) कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या कथित मनमानी कारभाराला कंटाळून सामूहिक स्वेच्छानिवृत्ती (VRS) अर्ज सादर केला आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM), सीएसएमटी यांना संयुक्त अर्ज देत कर्मचाऱ्यांनी गंभीर तक्रारी मांडल्या आहेत.

अर्जामध्ये कर्मचाऱ्यांनी नमूद केले आहे की, ड्युटीदरम्यान पुरवले जाणारे अन्न निकृष्ट व अस्वच्छ असून ते आरोग्यास अपायकारक आहे. तसेच रनिंग रूम व विश्रांतीगृहांची अवस्था दयनीय असल्याने आवश्यक विश्रांती मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या मार्ग, प्रकाशव्यवस्था आणि मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने विशेषतः रात्रीच्या वेळी जीवितास धोका निर्माण होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Central Railway : मुंबईतील लोको पायलटचा मोठा निर्णय, सामूहिक स्वेच्छानिवृत्ती घेणार, पण कारण काय ?
Akola : एका लग्नाची अजब गोष्ट! सोशल मीडियावर जुळल्या रेशीमगाठी, साडेतीन फूट नवरदेव आणि तीन फूट नवरीच्या लग्नाची सर्वत्र चर्चा

याशिवाय प्रशासनाकडून होत असलेला अवाजवी दबाव, अनावश्यक हस्तक्षेप आणि तणावपूर्ण कामाचे वातावरण यामुळे मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत असल्याचे अर्जात नमूद आहे. अनियमित ड्युटी तास आणि कुटुंबीयांपासून दुरावा यामुळे कौटुंबिक आयुष्यही विस्कळीत होत असल्याची खंत कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. “वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस सुधारणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोग्य, सन्मान आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वेच्छानिवृत्तीचा मार्ग स्वीकारावा लागत आहे,” असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Central Railway : मुंबईतील लोको पायलटचा मोठा निर्णय, सामूहिक स्वेच्छानिवृत्ती घेणार, पण कारण काय ?
Maharashtra Politics : महापौर निवडणुकीआधी भिवंडीत मोठी घडामोड, भाजपच्या नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न

या सामूहिक VRS अर्जामुळे रेल्वे प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, लोको पायलटांच्या सुरक्षाविषयक आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com