सचिन गाड, मुंबई|ता. २१ सप्टेंबर
Mumbai News: मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवरुन कॅब चालकाने उडी मारुन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अल्ताफ हुसैन असे आत्महत्या केलेल्या कॅब चालकाचे नाव असून तो गोवंडीचा राहणारा असल्याचे सांगण्यात येत आहे. सी लिंकवरून उडी मारल्यानंतर वरळी किल्ल्याजवळ त्याचा मृतदेह सापडला. प्राथमिक तपासानुसार ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सध्या सुरु आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईतील वांद्रे-वरळी सी लिंकवरून एका टॅक्सीने उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास मुंबई पोलिसांना पोलीस नियंत्रण कक्षाला फोन आला, मात्र घटनास्थळी पोहोचल्यावर सी लिंकजवळ उभ्या असलेल्या कारमधून एका व्यक्तीने समुद्रात उडी मारल्याचे त्यांना आढळून आले. रात्रीचा अंधार आणि समुद्राच्या उंच लाटा यामुळे मृतदेह सापडला नाही.
मृतदेहाचा शोध सुरु असतानाच दादर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उडी मारलेल्या व्यक्तीचा मृतदेह असल्याची माहिती वरळी पोलीस ठाण्याला सकाळी साडेसात वाजता मिळाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात आला. अल्ताफ मोहम्मद हुसेन असे मृताचे नाव असून तो व्यवसायाने टॅक्सी चालक होता, या आत्महत्येमागचे कारण अद्याप समोर आले नसून ऑनलाईन गेमिंगमध्ये पैसे हरल्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सात दिवसांपूर्वीच हा पूल सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आला होता. सुमारे 14 हजार कोटी रुपये खर्चाचा 'कोस्टल रोड' 13 सप्टेंबर रोजी सर्वसामान्यांसाठी खुला झाला होता. हा मोटरवे वांद्रे-वरळी 'सी लिंक' शी थेट कनेक्टिव्हिटी प्रदान करतो, प्रवासाचा वेळ कमी करतो आणि दक्षिण मुंबई आणि उपनगरांदरम्यान वाहतूक सुलभ करतो. 'कोस्टल रोड' आणि 'सी लिंक'ला जोडणाऱ्या रस्त्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पाहणी केली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.