Mumbai Crime News: बोरिवलीत फसवणक, झारखंडमध्ये अटक; फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

बोरिवलीत फसवणक, झारखंडमध्ये अटक; फिल्मी स्टाईलने पाठलाग करून आरोपीच्या मुसक्या आवळल्या
Mumbai Latest Crime News
Mumbai Latest Crime Newssaam tv

>> संजय गडदे

Mumbai Latest Crime News: मुंबईच्या बोरिवली पोलिसांनी झारखंडमधून एका सायबर ठगला अटक केली आहे. जो बँकेच्या केवायसीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ८ फेब्रुवारी रोजी बोरिवली येथील रहिवासी असलेल्या तक्रारदाराने बोरिवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली की, बँकेचे केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून २ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यानंतर बोरिवली पोलिसांनी सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू केला.

Mumbai Latest Crime News
Sharad Pawar Latest Press Conference: 'वय मुद्दा नाही, ८२ काय वयाच्या ९२ वर्षांपर्यंतही लढू, शरद पवारांनी बंडखोरांना ठणकावून सांगितलं...

तांत्रिक विश्लेषण सूत्रांच्या मदतीने आरोपी झारखंडमध्ये असल्याचे निष्पन्न झाले. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गाव बरड दुब्बा तहसील पालाजोरी जिल्हा देवघर झारखंड येथे छापा टाकला. (Latest Marathi News)

जिथे आरोपी हुसेन अजगर अली अन्सारी (21) हा 14 मोबाईल घेऊन बसला होता. पोलीस उपनिरीक्षक कल्याण पाटील यांनी आरोपी हुसेन अजगर अली अन्सारी (21) याला फिल्मी स्टाईलमध्ये अर्धा किलोमीटर पळून अटक केली.

Mumbai Latest Crime News
Karad Accident News: पुणे- बंगळूर महामार्गावर बसचा भीषण अपघात; चालकासह १५ प्रवाशी जखमी

त्यांच्याकडून 14 मोबाईल आणि अनेक सिमकार्ड जप्त करण्यात आले. तक्रारदाराच्या खात्यातून आरोपींनी ट्रान्सफर केलेल्या 2 लाख रुपयांपैकी 1 लाख रुपये आयसीआयसीआय बँकेच्या कोलकाता शाखेत गोठवण्यात आले आहेत. या फसवणुकीत किती जणांचा सहभाग आहे आणि त्यांनी आतापर्यंत किती लोकांची फसवणूक केली आहे, याची बोरीवली पोलीस आरोपींकडे चौकशी करत आहेत.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com