High Court on Marriage : साखरपुड्यानंतर मुलगी पळून गेली तर गुन्हा होऊच शकत नाही : हायकोर्ट

Mumbai High Court on Marriage : साखरपुडा झाल्यानंतर मुलगी पळू प्रियकरासोबत पळून गेली तर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येत नाही, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टाने केली.
Mumbai High Court on Marriage
Mumbai High Court on MarriageSaam TV
Published On

आई-वडिलांनी ठरवून दिलेल्या मुलाशी लग्न करण्याआधीच मुलगी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली तर तिच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करता येत नाही, अशी टिप्पणी मुंबई हायकोर्टाने एका प्रकरणाची सुनावणी घेताना केली. फसवणुकीचा गुन्हा नोंद करायचा असेल तर तक्रारीत फसवणूक हेतू दर्शवला पाहिजे, असं नमुद करत हायकोर्टाने पोलिसांना गुन्हा रद्द करण्याचे आदेश दिले.

Mumbai High Court on Marriage
Mumbai High Court : आधी प्रियकराविरोधात बलात्काराची तक्रार, नंतर जामिनालाही संमती; हायकोर्ट संतापलं!

मुंबईतील एका तरुणीचे पुण्यातील तरुणासोबत लग्न ठरले होते. 1 मे 2022 रोजी दोघांचा थाटामाटात साखरपुडा पार पडला. मात्र, साखरपुड्यानंतर सदरील तरुणी आपल्या प्रियकरासोबत पळून गेली. त्यानंतर दोघांनी लग्न देखील केले.

दरम्यान, तरुणीचे आधीपासूनच प्रेमसंबंध होते. याची माहिती तिच्या कुटुंबियांना असूनही त्यांनी आमच्या मुलासोबत तिचे लग्न ठरवून आमची फसवणूक केली, असं म्हणत तरुणाच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

तक्रारीनुसार पोलिसांनी तरुणीसह तिच्या कुटुंबियांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. हा गुन्हा रद्द करण्यासाठी कुटुंबियांनी मुंबई हायकोर्टात धाव घेत याचिका दाखल केली. या याचिकेवर गुरुवारी (ता. 28) न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली.

कोर्टाने प्रथम दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतला. त्यानंतर निकाल देताना साखपुडा झाल्यानंतरही मुलगी तिच्या प्रियकरासोबत पळून गेली तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला जाऊ शकत नाही, अशी टिप्पणी केली.

तरुणी आणि तिच्या कुटुंबियांचा तक्रारदार आणि त्यांच्या नातेवाईकांना फसवण्याचा मुळीच हेतू नव्हता. आपल्या प्रेमाबाबत संबंधित तरुणी तिच्या आई-वडिलांना माहिती देऊ शकली नाही. कदाचित तिच्यामध्ये तितके धाडस नसावे, यामुळेच ती पळून गेली असावी, असंही हायकोर्टाने म्हटलं.

यामधून तरुणीला आणि तिच्या कुटुंबियांना कोणताही लाभ झालेला नाही. उलट साखरपुडा झाल्यानंतर मुलगी पळून गेल्याने त्यांचीच समाजात बदनामी झाली, असंही खंडपीठाने स्पष्ट केलं. तरुणीचा प्रेमाबद्दल मौन बाळगण्याचा निर्णय अयोग्य होता, असं म्हणत कोर्टाने ताशेरे देखील ओढले. तसेच फसवणुकीचा गुन्हा रद्द करण्याचे पोलिसांना आदेश दिले.

Mumbai High Court on Marriage
Mumbai High Court : स्पर्म किंवा अंडाशय डोनर मुलांवर कायदेशीर हक्क सांगू शकत नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्वाळा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com