Ashish Shelar: 'BBC च्या बोगस डॉक्यूमेंट्रीचा शो कराल तर ...' आशिष शेलारांचा टाटा इंस्टिट्यूटला इशारा

'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यावरुन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी TSS ला इशारा दिला आहे.
Ashish Shelar Viral Tweet On BBC Documentary
Ashish Shelar Viral Tweet On BBC DocumentarySaam Tv

Ashish Shelar Tweet on BBC Documentary: बीबीसीच्या डॉक्यूमेंट्रीवरुन सध्या देशभरात गोंधळ सुरू असलेल्याचे पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच या डॉक्यूमेंट्रीवर केंद्र सरकारने देशात बंदी घातली होती. बंदीनंतर अनेक विद्यापीठांमध्ये डॉक्यूमेंट्रीचे स्क्रिनिंग झाल्यामुळे हा वाद निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर आता 'बीबीसी'चा मोदींवरील माहितीपट दाखवण्यास मुंबईतील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सनेमध्येही वाद रंगला आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी यावरुन TSS ला इशारा दिला आहे. (Ashish Shelar Tweet)

Ashish Shelar Viral Tweet On BBC Documentary
Sanjay Raut: 'केंद्र सरकार सावरकर, बाळासाहेबांना विसरले', मुलायमसिंहांच्या पुरस्कारावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

काय म्हणाले आशिष शेलार....

BBC च्या बोगस डॉक्युमेंट्रीचा शो करुन मुंबई आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था Tata Institute of Social Sciences (TISS) बिघडू पाहतेय. पोलीसांनी तातडीने त्यावर बंदी घालावी अन्यथा आम्ही घ्यायची ती भूमिका घेऊ, TISS ने हे असले धंदे बंद करावेत असा इशारा आशिष शेलार यांनी ट्विटमधून दिला आहे.

Ashish Shelar Viral Tweet On BBC Documentary
Jalna : रेल्वे खाली जाणार ताेच...जीवाची बाजी लावत जवानाने वाचविले प्रवाशाला; पाहा थरारक व्हिडिओ

TC ने जारी केले परिपत्रक...

त्याआधी टाटा इंस्टिट्यूटने एक परिपत्रक जारी केले असून यामध्ये ही डॉक्यूमेंट्री दाखवण्यास नकार दिला आहे.

इन्स्टिट्यूटमधील काही विद्यार्थी मोंदीवरील माहितीपट संस्थेच्या प्रांगणात दाखवण्याची तयारी करत आहे. या माहितीपटावरून देशातील काही संस्थेत अशांतता निर्माण झाली आहे. तसेच या माहितीपटाला विरोध करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी संस्थामध्ये बैठका देखील घेतल्याची माहिती देखील मिळत आहे. त्यामुळे संस्थेतील विद्यार्थ्यांना सूचना करण्यात येत आहे की, अशा कोणत्याही कृतीत सहभागी झाल्यास विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. असे या परिपत्रकात म्हणले आहे.

काय होतोय Documentry वरुन वाद...

2002 च्या गुजरात दंगलीप्रकरणी बीबीसीची ही 59 मिनिटांची डॉक्युमेंटरी आहे. ब्रिटिश फॉरेन ऑफिसच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं हा माहितीपट तयार करण्यात आलाय. भाजप (BJP) समर्थकांचं म्हणणं आहे की, सुप्रीम कोर्टानं याबाबत एकदा निर्णय दिल्यानंतर विदेशी मीडिया अजूनही यात मोदींना अडकवू पाहत आहे. तर दुसरीकडे बीबीसी आपल्या माहितीपटावर ठाम आहे, सर्व मतांना स्थान देऊन भारताच्या इतिहासातली एका महत्वाच्या घटनेवर हा माहितीपट बनवल्याचा त्यांचा दावा आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com