Jalna : रेल्वे खाली जाणार ताेच...जीवाची बाजी लावत जवानाने वाचविले प्रवाशाला; पाहा थरारक व्हिडिओ

संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
jalna, Jalna Railway Station,
jalna, Jalna Railway Station, saam tv

Jalna Railway Station : धावत्या रेल्वेत बसण्याचा प्रवाशाचा प्रयत्न फसला आणि ताे रेल्वेच्या रुळावर पडणार ताेच त्याला आरपीएफचे जवानाने जीवाची पर्वा न करता वाचवले. या घटनेनंतर आरपीएफ जवान आणि त्यांना मदत करणा-या प्रवाशाचे जालना (jalna) रेल्वे स्थानकावरील प्रवाशांनी टाळ्यांचा कडकडाट करुन अभिनंदन केले. जीव वाचलेल्या प्रवाशाने देखील दाेघांचे आभार मानले. (Maharashtra News)

jalna, Jalna Railway Station,
Soyabean Market Price : स्थिरावलेला सोयाबीनचा दर उचल खाणार, शेतक-यांना अपेक्षा

या घटनेबाबतची अधिक माहिती अशी - शुक्रवारी जालना रेल्वे स्थानकावर पुणे-नांदेड एक्सप्रेस निर्धारित वेळेत आली. जालना स्थानकावरुन नांदेडसाठी (nanded) रेल्वे रवाना हाेताना एका प्रवाशाने चालत्या रेल्वेत बसण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा प्रयत्न फसला. प्रवाशाचा तोल गेल्याने तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला.

jalna, Jalna Railway Station,
Pune- Bhusaval Train Cancelled : आजपासून तब्बल दाेन महिने भुसावळ- पुणे रेल्वे रद्द; जाणून घ्या कारण

ही बाब या ठिकाणी कर्तव्य बजावत असणाऱ्या आरपीएफचे जवान आसाराम झुंजरे यांच्या लक्षात आली. त्यांनी तडक प्रवाशाकडे धाव घेतली. दुस-या बाजूने झुंजरे यांच्या मदतीला एक प्रवासी धावून आला. दाेघांनी जीवाची पर्वा न करता रेल्वेखाली जाणार्‍या प्रवाशाला ओढून बाहेर काढले. या घटनेचा संपूर्ण थरार हा सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

jalna, Jalna Railway Station,
Vijay Zol News : लोकांचे बुडालेले पैसे द्या अन्यथा तुमच्या घरावर मोर्चा काढू; काॅंग्रेस आमदारांना इशारा

या घटनेनंतर रेल्वे स्थानकावर उपस्थित प्रवाशांनी जवान झुंजरे आणि प्रवाशाचे अभिनंदन केले. या घटनेबद्दल साम टीव्हीशी बाेलताना झुंजरे म्हणाले पुणे ते नांदेड ही एक्सप्रेस सकाळी पावणे आठ वाजता जालना रेल्वे (railway) स्थानकात आली. पाच मिनिटांचा कालावधी झाल्यानंतर रेल्वे नांदेडला रवाना हाेत हाेती.

त्यावेळी एक प्रवाशी धावत आला असताना धावत्या गाडीत तो रेल्वेत बसण्याचा प्रयत्न करत हाेता. त्यांनी रेल्वे दरवाजा धरून पायरीवर पाय देण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडीचा वेग जास्त असल्याने त्याचा पाय पायरीवरून निसटल्याने तो रेल्वे आणि प्लॅटफॉर्मच्यामध्ये अडकला. हे मी पाहिले आणि त्याच्याकडे धावत त्याला संकटातून बाहेर काढले. मला एका प्रवाशाने मदत केल्याचे ही झुंजरे यांनी नमूद केले. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com