Sanjay Raut: 'केंद्र सरकार सावरकर, बाळासाहेबांना विसरले', मुलायमसिंहांच्या पुरस्कारावरुन संजय राऊतांचा हल्लाबोल

, ज्या मुलायमसिंह यादव यांना भाजपने ‘मौलाना मुलायम’ म्हणून हिणवलं त्याच मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं, अशी टीका करण्यात आली आहे.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

Mumbai: केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंधेला पद्य पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये समाजवादी पक्षाचे दिवंगत संस्थापक मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. केंद्र सरकारच्या या निर्णयाने सर्वांनाच धक्का बसला होता.

ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मुलायमसिंह यादव यांच्या पुरस्कारावर आक्षेप घेत केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. (Sanjay Raut)

Sanjay Raut
Sharad Pawar: 'सत्ताधाऱ्यांसोबत बहुमताचा आकडा नसेल' सर्वेक्षणाबाबत शरद पवारांचे मोठे विधान, राज्यपालांवरही केली टीका

काय म्हणाले राऊत...

मुलायमसिंह यादव यांना दिलेल्या पुरस्कारावर आक्षेप घेताना संजय राऊतांनी सरकारला बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विसर पडला आहे अशी जोरदार टीका केली. त्याचबरोबर सावरकरांना भारतरत्न पुरस्कार कधी देणार असा सवालही त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

सामनामधूनही टीका...

ज्या मुलायमसिंह यादव यांनी कारसेवकांना गोळया घालून ठार केलं, ज्या मुलायमसिंह यांना भाजपने ‘मौलाना मुलायम’ म्हणून हिणवलं त्याच मुलायमसिंह यादव यांना पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. मात्र, स्वातंत्र्यवीर सावरकर आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे या दोन हिंदुहृदय सम्राटांना पुरस्कार देण्यात आला नाही. त्यांना मोदी सरकार विसरले. सावरकरांना पुरस्कार देण्यापासून मोदी सरकारला कोणी रोखले होते? असा संतप्त सवाल दैनिक सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आला आहे.

Sanjay Raut
Chandrapur Accident News: साखर झोपेत काळाचा घाला; बसचा भीषण अपघात, २ ठार १७ जखमी

त्याचबरोबर बाळासाहेबांच्या नावाने दुकान चालविणारे सरकार राज्यात आहे. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावण्याचा मोठा गाजावाजा केला. पण याच सरकारने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वीर सावरकर यांच्या नावाची भारतरत्नासाठी शिफारस केली असती तर त्यांचे हे ढोंग लपले गेले असते, असा टोलाही सामनामधून लगावण्यात आला आहे. (Shivsena)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com