Mumbai Crime News : मुंबई पोलिसांना मोठं यश; अंधेरीतील बेपत्ता 4 भावंड मध्य प्रदेशमध्ये सापडले, घर सोडण्याचं कारणही आलं समोर

Mumbai Crime Latest News : मुंबईतील ४ मुले बेपत्ता झाले होते. सावत्र आईच्या कंटाळून ४ मुले घर सोडून गेले होते. या बेपत्ता मुलांना मुंबई पोलिसांनी शोधून काढलं.
मुंबई पोलिसांना मोठं यश; ९ दिवसांपासून बेपत्ता 4 भावंड मध्य प्रदेशमध्ये सापडले, घर सोडण्याचं कारणही आलं समोर
Mumbai Crime NewsSaam tv

संजय गडदे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मुंबईतील एमआयडीसी पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. मुंबई पोलिसांनी ९ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या चार भावडांना मध्य प्रदेशातून शोधून काढलं आहे. सावत्र आईच्या छळाला कंटाळून चारही भावंडे घर सोडून निघून गेले होते.

मुंबईतील एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारे ४ भावंडे सावत्र आईच्या छळाला कंटाळले होते. या चौघांनी २६ मे रोजी घर सोडण्याचा निर्णय घेतला. या भावंडांनी घर सोडून मध्य प्रदेशच्या दिशेने धाव घेतली होती. गेल्या ९ दिवसांपासून चार भावंड बेपत्ता होते. मुले बेपत्ता झाल्यावर त्यांच्या मामांनी पोलिसांत तक्रार नोंदवली होती.

मुंबई पोलिसांना मोठं यश; ९ दिवसांपासून बेपत्ता 4 भावंड मध्य प्रदेशमध्ये सापडले, घर सोडण्याचं कारणही आलं समोर
Thane-Navi Mumbai Rain: नवी मुंबई- ठाण्यात मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात, उकाड्याने हैराण नागरिकांना दिलासा

पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या चार भावंडाचा शोध सुरु केला होता. या चार भावंडाचा शोध घेताना पोलिसांना ४ भावंड मध्य प्रदेशमध्ये सापडले. गेल्या ९ दिवसांपासून चार भावंड बेपत्ता होते. एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने ग्वालियरमधून चारही भावंडाना शोधून काढले. मुले बेपत्ता झाल्यापासून मुलांना विकल्याची अफवा पसरली होती.

मुंबई पोलिसांना मोठं यश; ९ दिवसांपासून बेपत्ता 4 भावंड मध्य प्रदेशमध्ये सापडले, घर सोडण्याचं कारणही आलं समोर
Mumbai Crime News: मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची आत्महत्या; इमारतीवरुन घेतली उडी, कारण अद्याप अस्पष्ट

पोलिसांनी बेपत्ता मुलांचे मित्र-मैत्रिणी आणि सीसीटीव्ही फुटेज यांचा तांत्रिक तपास सुरु केला. त्यानंतर ही मुले मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे एका अनोळखी व्यक्तीसोबत दिसले. यानंतर पोलिसांनी ग्वाल्हेर रेल्वे स्टेशन परिसर आणि शहरातील 80 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. ही सर्व मुले त्या अनोळखी व्यक्तीसोबत माधव बालनिकेतन या आश्रमात असल्याचे समजले.

स्थानिक पोलीसांच्या मदत घेत एमआयडीसी पोलिसांचे पथक आश्रमात पोहोचले. मात्र बेपत्ता झालेल्या भावंडांपैकी सर्वात मोठ्या मुलीने आश्रमात लेखी अर्ज देऊन तेथे राहण्याची सोय करण्याची विनंती केली होती. तसेच वडील घेऊन जाण्यास आल्यास त्यांना आमचा ताबा देऊ नये, असेही सांगितले.

दरम्यान, मुंबई पोलिसांच्या पथकाने या चारही भावंडांना दोन जून रोजी ताब्यात घेऊन ग्वाल्हेर येथील बालकल्याण समिती समोर हजर केलं. त्यानंतर मुंबईमध्ये आणण्याची कार्यवाही सुरू केली. या भावंडांकडे संपर्काचे कोणतेही साधन नसताना तपास पथकाने कौशल्य वापरून तीन मुली व एका मुलाचा शोध घेतला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com