प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर आयुष्यात खूप काही करता येते, असं म्हणतात. जर एखाद्या व्यक्तीकडे काहीतरी करण्याची जिद्द असेल तर ती व्यक्ती आयुष्यात खूप मोठी होते. अशाच इच्छाशक्तीच्या जोरावर मुंबईतील अनामता अहमदने आयसीएससी बोर्डात दहावीच्या परिक्षेत ९२ टक्के गुण मिळवले आहे. अनामताने दोन वर्षांपूर्वी विजेचा शॉक लागून आपला उजवा हात गमावला. परंतु हार न मानता अनामताने दहावीच्या परिक्षेत घवघवीत यश मिळवले आहे.
अनामता १३ वर्षांची असताना अलीगढला गेली होती. भावंडासोबत खेळत असताना 11KV केबलला चुकून हात लागल्याने तिला शॉक लागला. यात तिला गंभीर दुखापत झाली. तिचा उजवा हात पूर्णपणे कापावा लागला. अनामताच्या डाव्या हातादेखील दुखापत झाली होती. तिचा डावा हात फक्त २० टक्केच काम करत होता. अनामता जवळपास ५० हून अधिक दिवस अंथरुणाला खिळून होती. आपल्याला आता उजव्या हाताने काहीच करता येणार नाही, असा विचार न करता अनामताने खूप जिद्दीने दहावीच्या परिक्षेत यश मिळवले आहे.
अनामताने दहावीत ९२ टक्के मिळवले आहेत. तसेच अनामताने हिंदी विषयात ९८ मार्क्स मिळवले आहेत. मुंबईतील अंधेरीतील सिटी इंटरनॅशनल शाळेत अनामता शिकत होती. अनामताच्या या यशाचे तिच्या शिक्षकांनाही खूप कौतुक आहे. तिच्या शिक्षकांनी सांगितले की, 'अनामता ही नेहमीच हुशार विद्यार्थिनी होती. ती खूप वाईट अनुभवातून गेली आहे. ती कदाचित नैराश्येतदेखील जाऊ शकत होती. तिला खूप शारिरिक वेदना होत होत्या. परंतु तिच्या सकारात्मक विचारांनी तिला यश मिळवून दिले आहे'. याबाबत टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे.
अनमताला मिळालेल्या यशामुळे ती खूपच आनंदी आहे. या यशाबद्दल सांगताना ती म्हणाली की, 'मी अभ्यासाठी एक किंवा दोन वर्ष विश्रांती घ्यावी, असे डॉक्टरांनी माझ्या पालकांना सांगितले होते. परंतु मी असे करण्यास तयार नव्हती. मला घरी बसायचे नव्हते. शाळेने मला प्रेरणा देण्याचे काम केले'.
परिक्षेची तयारी करताना अनामताला खूप आव्हानांचा सामना करावा लागला. त्याबाबत तिने सांगितले की, 'हॉस्पिटलमधून परत आल्यावर मला सर्वप्रथम माझा डावा हात पूर्णपणे कार्यक्षम करायचा होता. त्यासाठी मी डॉक्टरांनी सांगितलेले व्यायाम केले. माझ्या डाव्या हाताने लिहणे मला खूप अवघड गेले. परंतु काही महिन्यांनी मी डाव्या हाताने लिहण्यास शिकले. परंतु लिहण्याच्या स्पीडबाबत कोणतीही तडजोड नको म्हणून मला एक रायटर (writer) देण्यात आला'.
'मी एकुलती एक मुलगी असल्याने मला या अपघातातून लवकरच बाहेर यावे लागेल, असं मी ठरवलं होतं. मी हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भाजलेल्या अत्यंत भीतीदायक केस पाहिल्या आहेत. मी जिवंत आहे यासाठीच स्वतः ला सुदैवी समजते', असंही ती म्हणाली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.