Mumbai Air Pollution: दिवाळीत फटाके फोडण्याचा वाईट परिणाम भारताच्या राजधानीला झाला. मुंबईला मोठ्या वायू पीएएम २.५ पातळ्यांमध्ये ५०.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. फक्त मुंबईच नाही तर अशी अनेक शहरे आहेत त्यांना फटाके फोडण्याचा चांगलाच परिणाम वायू प्रदूषणाने दिला आहे. ही प्रदूषणाची पातळी दिवाळी नंतर वेगाने वाढत आहे.
कोणत्या वर्षी किती टक्क्यांनी वाढ? आणि काय झाला होता परिणाम
२०२१ जानेवारीपासून वायु प्रदूषणाने मुंबईत जवळपास १४,००० व्यक्तींचा मुत्यू झाला होता. त्याचा परिणाम २०२४ च्या अर्थव्यवस्थेवर पडला. त्यामुळे नुकताच मुंबई शहराला २.१ बिलियन यूएस डॉलर्सचा खर्च करावा लागला. गेल्या पाच वर्षांमध्ये मुंबईतील वायू प्रदूषण पातळ्यांमध्ये धक्कादायक ३०५ टक्क्यांची वाढ झाली आहे, तसेच २०१९ ते २०२३ दरम्यान हवेचा दर्जा २२ टक्क्यांनी खालावला आहे.
वायू प्रदुषणाला मुंबईकर पडले बळी
दिवाळी अद्याप संपलेली नाही. मात्र मु्ख्य सण समाप्त झाले. त्या सणांमध्ये अनेक फटाके आनंदात फोडले गेले पण त्याचा परिणाम गंभीर झाला. मुंबईत वायु प्रदुषणामुळे श्वसनाच्या आजारांमध्ये झपाट्याने वाढ झाली. या समस्येमुळे मुंबईतील पेडिएट्रिक हॉस्पिटलमध्ये एका महिन्यात ३० टक्के रुग्णांची वाढ झाली.
तज्ञांचे मत काय?
''वृद्धांना हृदय व फुफ्फुस संबंधित आजार, मुलांना श्वसनविषयक आजार अशा स्वरूपात आरोग्यावर होणारे परिणाम दिसून येत आहे, तसेच कोमोर्बिडीटीज असलेल्या व्यक्तींची प्रकृती अधिक खालावण्याची शक्यता वाढली आहे.'' असे रिसर्च असोसिएट अनन्या महाजन म्हणाल्या आहेत. यातूनच हाच निष्कर्ष येतो की, आयुष्य कमी होण्यासोबत व्यक्तींमध्ये आजारांचे प्रमाण वाढले आहे.
तर सिस्टम ऑफ एअर क्वॉलिटी फोरकास्टिंग अँड रिसर्च (एसएएफएआर)चे संस्थापक डॉ. गुफरान बैग यांनी चेतावणी दिली आहे की मुंबईने दिल्लीमधील वायू प्रदूषण संकटामधून शिकले पाहिजे. ''घातक वायू प्रदूषकांपासून निवासींचे संरक्षण करण्यासाठी आपण सक्रियपणे कार्य केले पाहिजे,'' असे ते म्हणाले.
वायू प्रदूषणाचे निराकरण करण्यासाठी सरकारी उपक्रम
मुंबई क्लायमेट अॅक्शन प्लॅन (एमसीएपी)चा निव्वळ-शून्य आणि अनुकूल हवामानयुक्त मुंबई घडवण्याचा मनसुबा आहे. तसेच, हवामान बदलाच्या परिणामांचे निराकरण करण्यासाठी आणि शहरी स्थिरता वाढवण्यासाठी परिवर्तनात्मक हवामान सोल्यूशन्स व समन्वित प्रशासनाचा दृष्टिकोन आहे. तर, पॅरिस अॅग्रीमेंटशी बांधील राहत मुंबईचे २०३० पर्यंत ग्रीनहाऊस गॅस उत्सर्जनांमध्ये ५० टक्के घट करण्याचे लक्ष्य आहे आणि २०५० पर्यंत निव्वळ-शून्य उत्सर्जनासाठी प्रयत्न करत आहे.
इलेक्ट्रिक वेईकल महत्त्वाचे
मुंबईकरिता महत्त्वपूर्ण, दीर्घकालीन धोरण म्हणजे इलेक्ट्रिक वेईकल (ईव्ही) अवलंबतेला गती देणे. आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकींचा राष्ट्रीय विक्री शेअर ५ टक्के होते, तर महाराष्ट्राचे विक्री शेअर ८ टक्के होते. राज्याला ईव्ही ताफा विस्तारित करण्यासाठी आणि चार्जिंग पॉइण्ट्सची संख्या वाढवण्यासाठी सन्मानित करण्यात आले आहे. महाराष्ट्र ईव्ही पॉलिसी २०२१ शाश्वत, शुद्ध परिवहनाला चालना देते, जेथे या पॉलिसीचा २०२५ पर्यंत नवीन वाहन नोंदणींमध्ये इलेक्ट्रिक वेईकल्सचे १० टक्के प्रमाण असण्याचा मनसुबा आहे.
इलेक्ट्रिक सार्वजनिक परिवहनाला चालना
राज्यातील सहकारी गृहनिर्माण संस्था आणि निवासी कल्याण संस्थांना अर्ज केल्याच्या सात दिवसांच्या आत ईव्ही चार्जिंग पॉइण्ट्स स्थापित करण्यासाठी एनओसी मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र इलेक्ट्रिक बसेसच्या सर्वोच्च आकडेवारीसह देखील देशामध्ये अग्रस्थानी आहे. मुंबईतील वायू प्रदूषण संकट परिवर्तनात्मक बदलासाठी महत्त्वाचा क्षण आहे. नाविन्यतेचा अवलंब करत आणि समुदायाशी संलग्न होत शहर शाश्वत भविष्य घडवू शकते.
Written By: Sakshi Jadhav
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.