Mumbai : मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! सातही तलावांत ९५.८७ टक्के पाणीसाठा; कोणत्या तलावात किती पाणी? जाणून घ्या

Mumbai Water Storage News : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये 95.87 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. विहार तलाव 100 टक्के भरला असून मुंबईकरांना पाणीटंचाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Mumbai Seven Lakes Water Stock Reaches 95.87 Percent | Monsoon 2026
Mumbai Seven Lakes Water Stock Reaches 95.87 Percent | Monsoon 2026AI Image
Published On
Summary
  • मुंबईची ७ महत्त्वाच्या तलावांमधील पाणीपातळीत वाढ

  • विहार तलाव १००% भरला असून ७ जुलैपासून ओसंडून वाहत आहे

  • मुंबईकरांची भविष्यातील पाणी टंचाईची चिंता मिटली

मुंबईला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सात प्रमुख तलावांमध्ये यंदाच्या पावसाळ्यात समाधानकारक पाणीसाठा जमा झाला आहे. शुक्रवार, 28 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजता उपलब्ध आकडेवारीनुसार, सातही तलावांमध्ये एकूण 13,87,534 दशलक्ष लिटर पाणीसाठा असून, तो त्यांच्या एकूण उपयुक्त जलसाठ्याच्या 95.87 टक्के इतका आहे. मात्र, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचा पाणीसाठा किंचित कमी आहे.

आज म्हणजेच २८ ऑगस्ट रोजी मुंबईतील सात तलावांमध्ये 13,91,784 दशलक्ष लिटर म्हणजेच 96.14 टक्के पाणीसाठा होता. तर 2024 मध्ये याच कालावधीत 13,87,820 दशलक्ष लिटर म्हणजे 95.29 टक्के पाणीसाठा नोंदवण्यात आला होता. सात तलावांपैकी विहार तलाव 100 टक्के भरलेला आहे. मोडक सागरमध्ये 99.99 टक्के, तानसामध्ये 98.37 टक्के, मध्य वैतरणामध्ये 97.57 टक्के, भातसामध्ये 95.91 टक्के, तुळशीमध्ये 98.33 टक्के, तर अप्पर वैतरणामध्ये 89.76 टक्के पाणीसाठा आहे.

Mumbai Seven Lakes Water Stock Reaches 95.87 Percent | Monsoon 2026
Sugar Rates : रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वसामान्य नागरिकांचं तोंड गोड! साखरेच्या दरात घसरण, १ किलोचे आजचे दर काय? वाचा

सध्या अप्पर वैतरणामध्ये 2,03,789 दशलक्ष लिटर, मोडक सागरमध्ये 1,28,910 दशलक्ष लिटर, तानसामध्ये 1,42,710 दशलक्ष लिटर, मध्य वैतरणामध्ये 1,88,834 दशलक्ष लिटर आणि भातसामध्ये 6,87,681 दशलक्ष लिटर पाणी आहे. विहारमध्ये 27,698 दशलक्ष लिटर, तर तुळशीमध्ये 7,911 दशलक्ष लिटर पाणीसाठा आहे. दरम्यान, तलावांच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासांत हलका पाऊस सुरूच होता. अप्पर वैतरणा परिसरात सर्वाधिक 25 मिमी पावसाची नोंद झाली. तानसा येथे 17 मिमी, मोडक सागर 15 मिमी, मध्य वैतरणा 14 मिमी, तुळशी 12 मिमी, विहार 6 मिमी आणि भातसा येथे 1 मिमी पाऊस झाला.

Mumbai Seven Lakes Water Stock Reaches 95.87 Percent | Monsoon 2026
Shocking : धक्कादायक! भाजप नेत्याच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू, अंतर्वस्त्रात आढळली चिठ्ठी; समोर आले कारण

यंदाच्या मान्सूनमध्ये आतापर्यंत अप्पर वैतरणामध्ये 3,635 मिमी, मोडक सागर 3,024 मिमी, तानसा 2,733 मिमी, मध्य वैतरणा 2,696 मिमी, भातसा 2,486 मिमी, तुळशी 3,437 मिमी आणि विहारमध्ये 2,501 मिमी पावसाची नोंद झाली आहे. विहार तलाव 7 जुलैपासून ओसंडून वाहत आहे. पावसाचा जोर आणि पाण्याची पातळी इतकीच राहिली तर नागरिकांना भविष्यात पाणी टंचाईची झळ बसणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com