ST Bus: दीपोत्सवाची एसटीकडून तयारी, पुण्यातून ५९८ अतिरिक्त बस, कुठून सुटणार एसटी?

Pune ST Mahamandal Extra 597 Bus For Diwali: दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. आता पुण्यातून ५९७ जास्त बस सोडण्यात येणार आहे.
ST Bus
ST BusSaam Tv
Published On

दिवाळीला अवघे काही दिवस उरले आहेत. दिवाळीला अनेकजण आपापल्या गावी जातात. दिवाळीसाठी प्रवासी वेगवेगळ्या वाहनांनी गावी जातात. दरम्यान, आता दिवाळीच्या पार्श्वभूमीवर परिवहन महामंडळाने मोठा निर्णय घेतला आहे.आता प्रवाशांच्या सोयीसाठी जास्त एसटी बस सोडण्यात येणार आहेत.

ST Bus
Bus Accident: भीषण अपघात! भरधाव बसची टँकरला धडक, ५० फूट खोल दरीत बस पलटली, अनेकजण वाहनाखाली दबले

परिवहन महामंडळाच्या पुणे विभागातून प्रवाशांच्या सोयीसाठी ५९८ जास्त बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे.१५ ते ५ नोव्हेंबर या कालावधीत जादा बस सोडण्यात येणार आहेत. यंदा पहिल्यांदाच विशेष बस पिंपरी-चिंचवड आगारातून सोडण्यात येणार आहेत, तर शिवाजीनगर आणि स्वारगेट येथून काही बस सोडल्या जाणार आहेत.

प्रवाशांची गावी जाण्याची व्यवस्था होणार आहे. पुण्यात नोकरी, शिक्षण आणि व्यवसायाच्या निमित्ताने राहणारे दिवाळीसाठी हे नागरिक गावी जातात. सध्या रेल्वेचे बुकिंग फुल झाले आहे. त्यामुळे नागरिकांना एसटी बसशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळेच परिवहन विभागाने हा निर्णय घेतला आहे.

ST Bus
MSRTC Aapli ST App : एसटीचा ठावठिकाणा समजणार, अ‍ॅप नेमकं कसं काम करणार? वाचा सविस्तर

पुण्यातील कोणत्या आगारातून किती बस सोडण्यात येणार?

शिवाजीनगर ८०बस (Shivaji Nagar Bus Stop)

स्वारगेट १२२बस

पिंपरी-चिंचवड ३९६ बस

एकूण ५९८ बस सोडण्यात येणार आहे.

या बसचे ऑनलाइन बुकिंग सुरू झाले आहे. नागरिक महामंडळाच्या संकेतस्थळ अथवा मोबाइल अॅपवरून तिकीट 66 दिवाळीसाठी एसटी महामंडळाच्या पुणे विभागाकडून १५ ऑक्टोबरपासून या जास्तीच्या बस सोडण्यात येणार आहेत. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. यंदा नागरिकांची दिवाळी चांगली होणार आहे. गावी जाण्याचा त्यांचा प्रवास सुखकर होणार आहे.

ST Bus
Banjara ST Category Demand: बंजारा समाजाच्या मागणीवरून वातावरण तापलं, नांदेडमध्ये आदिवासी समाजाचा महामोर्चा, VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com