चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न, RPF कॉन्स्टेबलमुळे वाचले गरोदर महिलेचे प्राण (Video)

कॉन्स्टेबल एस.आर. खांडेकर यांनी गर्भवती महिलेला ताबडतोब प्लॅटफॉर्मच्या दिशेने बाहेर ओढले महिलेचे प्राण वाचवले.
चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न, RPF कॉन्स्टेबलमुळे वाचले गरोदर महिलेचे प्राण
चालत्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्न, RPF कॉन्स्टेबलमुळे वाचले गरोदर महिलेचे प्राण सुमित सावंत

मुंबई - ट्रेन क्रमांक 02165 मध्ये संध्याकाळी 06:05 वाजता कल्याण स्थानकावर, चंद्रेश नावाचा प्रवासी त्यांच्या गर्भवती पत्नी वंदनासोबत ट्रेनमध्ये चढला. त्याला गोरखपूर एक्सप्रेस मध्ये प्रवास करायचा होता. पण जेव्हा ट्रेन सुरू झाली तेव्हा त्याला कळले की, आपण ज्या ट्रेनमध्ये बसलो ती आपली नाही. त्यामुळे चालत्या ट्रेनमधून त्यांनी उतरण्याचा प्रयत्न केला असता, तोल जाऊन गर्भवती महिला खाली पडली. तेव्हा ड्युटीवर असलेले कॉन्स्टेबल एस.आर. खांडेकर यांनी गर्भवती महिलेला ताबडतोब प्लॅटफॉर्मच्या दिशेने बाहेर ओढले महिलेचे प्राण वाचवले.

दरम्यान या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर आला आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्टेशनवरील आहे. यामध्ये, एक RPF कॉन्स्टेबल ट्रेनमधून खाली पडलेल्या गर्भवती महिलेचा प्राण वाचवताना दिसत आहे. महाराष्ट्रातील कल्याण रेल्वे स्थानकावरून सोमवारी एक ट्रेन सुटल्याचे या व्हिडिओमध्ये दिसून येत होते. यावेळी प्रवाशांमध्ये ट्रेनमध्ये चढण्याची आणि उतरण्याची स्पर्धा सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तेवढ्यात एक गर्भवती महिला चालत्या ट्रेनमधून प्लॅटफॉर्मवर उतरण्याचा प्रयत्न करत असताना तिचा तोल जाऊन ती महिला खाली पडली, तिला पडताना पाहून प्लॅटफॉर्मवर असलेले सगळेच प्रवासी घाबरुन गेले होते.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com