

उल्हासनगर : ज्या आईनं मुलांना अक्षरशः घरकामं करून वाढवले, शिक्षण दिलं, मोठं केलं, त्या आईला तिच्या ५० व्या वाढदिवशी मुलानं सरप्राईज म्हणून, चक्क हेलिकॉप्टरची राईड गिफ्ट केली आहे. मुलाचे हे अनोखे गिफ्ट पाहून आईला आनंदाश्रू अनावर झाले. उल्हासनगरच्या प्रदीप गरड याने त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची शहरात मोठी चर्चा आहे. रेखा दिलीप गरड या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आहेत.
लग्न होऊन, उल्हासनगरात आले आहेत. मात्र, मुले लहान असतानाच, अचानक पती दिलीप गरड यांचे निधन झाले. त्यावेळी मोठा मुलगा सातवीला मधली मुलगी पाचवीला, तर लहान मुलगा पहिलीत होता. यानंतर रेखा यांनी अतिशय कष्टाने तिन्ही मुलांना वाढवले. मुलांना पालन पोषणासाठी रेखा यांनी अक्षरशः लोकांच्या घरची घरकामी केली आहेत. मोठा मुलगा प्रदीप याला त्यांनी आश्रमशाळेत शिकवले.
हे देखील पहा-
तिथे प्रदीप यानेही अतिशय जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीला लागला आहे. प्रदीप हा बारावीला असताना अचानक एक दिवस त्यांच्या घरावरून हेलिकॉप्टर गेले आहे. यावेळी आपल्याला कधी यात बसायला मिळेल का? असे रेखा या सहज बोलून गेले आहेत. ती गोष्ट प्रदीपच्या मनात पक्की बसली. पुढे नोकरीत प्रगती करत प्रदीप हा आई आणि कुटुंबाला घेऊन चाळीतून स्वतःच्या फ्लॅटमध्ये आला.
लग्न झाले, दोन मुलं झाली, पण आईची 'ती' इच्छा कशी पूर्ण करावी? याची सतत त्याला बोचत होती. अखेर आईच्या ५० व्या वाढदिवसाला तिला सरप्राईज म्हणून, हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना प्रदीपला सुचली होती. श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी प्रदीपचे वाढदिवस असतो. त्यानुसार चौकशी करून त्याने सगळी तयारी केली आणि वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायकाचे दर्शन घ्यायचं असल्याचे सांगत आईला थेट जुहू एअरबेसला नेले.
तिथं हेलिकॉप्टर पाहून आईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आईसह प्रदीप, प्रदीपचे लहान भाऊ संदीप, प्रदीपची पत्नी, मुले यांनीही हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेतला आहे. यानंतर या सगळ्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारताच प्रदीप यांच्या आईला भावना आवरता आले नाहीत. या सगळ्यानंतर बोलताना प्रदीप याचाही कंठ दाटून आला होता. आईने आपल्याला खूप हालअपेष्टा सहन करून वाढवले मोथे केले आहे.
इतकंच नव्हे तर स्वतःच्या पायावर उभं केले आहे. त्यामुळे तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी भाग्य असल्याचे प्रदीप कृतज्ञपणे सांगत आहे. या सगळ्यामुळे आईचा आनंद गगनात मावेनासा आल्यानंतर प्रदीपनंही आनंद व्यक्त केला आहे. ज्या आईनं आपल्याला बोट धरून चालायला शिकवलं, त्याच आईची इच्छा पूर्ण करत तिला घेऊन हेलिकॉप्टरने आकाशाला गवसणी घालणारा प्रदीप गरड हा आजच्या युगातला श्रावणबाळच म्हणावा लागेल. यामुळेच असा मुलगा सगळ्यांना मिळो, असे त्याची आई सुद्धा म्हणायला विसरत नाही.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.