भिवंडीमध्ये शिवरायांचे अनोखे मंदिर

छत्रपतींचे ऐतिहासिक गडकोट किल्ले व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तू आजही दुर्लक्षित आहेत.
भिवंडीमध्ये शिवरायांचे अनोखे मंदिर
भिवंडीमध्ये शिवरायांचे अनोखे मंदिरSaam Tv
Published On

भिवंडी : छत्रपती शिवाजी महाराजांच्या Chhatrapati Shivaji Maharaj नावाचा राजकीय व्यासपीठावर उदोउदो सुरू असला, तरी छत्रपतींचे ऐतिहासिक गडकोट किल्ले व त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तू आजही दुर्लक्षित आहेत. ऐतिहासिक वास्तूंची अदुर्लक्षित अशी होत असताना भिवंडीमधील Bhiwandi मराडेपाडा Maradepada येथील शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे अनोखे मंदिर उभारण्यात आले आहे. Shivaraya temple in Bhiwandi

१ एकर जागे मध्ये भव्य साकारत असलेले हे मंदिर सर्वानांच प्रेरणादायी ठरणार आहे, असा विश्वास प्रतिष्ठा ने दिला आहे. मुगल साम्राज्यात भिवंडी शहर हे मोठं व्यापारी Merchant केंद्र होते. देश- विदेशामधील लोक या ठिकाणी एकत्र येऊन व्यवसाय करत असत. परंतु, ते मुगलशाहीला कंटाळून गेले होते. यावेळी शिवाजी महाराजांनी मुगलांचा पराभव करत, भिवंडी, कल्याण Kalyan यासारखी शहर काबीज केली होती.

हे देखील पहा-

ऐतिहासिक अशा भिवंडी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पदस्पर्श झाल्याचा उल्लेख देखील आपल्याला सापडतो. अशा भिवंडी तालुक्यामधील मराडेपाडा गावात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आकार घेत असल्याची माहिती शिवक्रांती प्रतिष्ठानचे कार्यकर्त्यांनी सांगितली आहे. आंध्र प्रदेशातील Andhra Pradesh श्रीशैलम येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे मंदिर बांधले गेले आहे. भिवंडीत गेल्या ३ वर्षांपासून भव्य मंदिराचे कामाला सुरूवात आहे. मंदिरासभोवताली सुमारे १ एकरचा परिसर असून, साधारण ३ गुंठ्यांच्या जागेमध्ये मंदिर बांधले जात आहे. Shivaraya temple in Bhiwandi

५५ फूट उंचीच्या मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची साडेसात फूट उंचीचे मूर्ती ठेवण्यात आले आहे. शिवराज्याभिषेका वेळेस छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनावर बसले होते, अशाच स्वरूपात काळ्या दगडाची मूर्ती विराजमान होणार आहे. ही खास मूर्ती कर्नाटकमधील Karnataka म्हैसूर Mysore याठिकाणी घडवली जात आहे. मंदिरा शेजारी किल्ल्याची तटबंदी बांधण्याचा प्रयत्न करत असल्याचे, शिवक्रांती प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे कुलदैवत आहेत. त्यांचे मंदिर बांधन्यात यावे, हे गेल्या अनेक वर्षांपासून मनात आहे.

भिवंडीमध्ये शिवरायांचे अनोखे मंदिर
महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच थ्रीडी प्रदर्शन

यामुळे आमच्या १ एकर जागेमध्ये मंदिर बांधण्याचा निर्णय प्रतिष्ठानच्या सर्वांनी मिळून घेतल आहे. मंदिरात आल्यावर एक प्रकारची ऊर्जा मिळावी, या दृष्टीने रचना करण्यात येत असून, मंदिराचे ९० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. भविष्यामध्ये मोकळ्या जागेत काही भागामध्ये एक वृद्धाश्रम बांधण्याचा विचार देखील आहे. शिवव्याख्याते घडवणे, योगशिबीर, पर्यावरण संरक्षण यासारखी विविध उपक्रम राबवले जाणार आहे. छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधले जात असल्याने, ही सर्वांसाठी महत्वाची आणि अभिमानाची बाब आहे. Shivaraya temple in Bhiwandi

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com