बदलापुरात पोलिसांकडून दंगल नियंत्रणाचं मॉकड्रील; अग्निपथच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची खबरदारी

नागरिकांच्या काळजाचा ठोका क्षणभर चुकला
Badlapur News
Badlapur NewsSaam Tv
Published On

बदलापूर - केंद्र सरकारने (Central Government) जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेच्या पार्श्वभूमीवर देशाच्या अनेक भागात उग्र निदर्शनं केली जातायत. याच पार्श्‍वभूमीवर बदलापूरमध्ये (Badlapur) पोलिसांनी दंगल नियंत्रणाचं मॉकड्रील केलं. अचानक मॉकड्रील घेण्यात आल्यानं परिसरातील नागरिकांच्या काळजाचा क्षणभर ठोका चुकला, मात्र नंतर हे मॉकड्रील असल्याचं स्पष्ट झालं आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

सैन्यभरतीची अग्निपथ योजना जाहीर करण्यात आल्यानंतर देशाच्या अनेक भागात हिंसक आंदोलनं केली जातायत. याच अनुषंगानं एखाद्या कठीण प्रसंगाला तोंड द्यायला सज्ज राहण्याच्या दृष्टीनं बदलापूर पश्चिमेच्या हेंद्रेपाडा आर्ट गॅलरीजवळ पोलिसांनी अचानक मॉकड्रील घेतलं. यामध्ये दंगल नियंत्रण आणि आपत्कालीन परिस्थितीवर नियंत्रण कसं मिळवावं, याचा सराव करण्यात आला. हेंद्रेपाडा भागात काही तरुणांची अचानक घोषणाबाजी सुरू झाली, त्यानंतर पोलीस, अग्निशमन दलाच्या गाड्यांचा ताफा हेंद्रेपाडा परिसरात दाखल झाला.

हे देखील पाहा -

पोलिसांकडून जमावाला शांततेचं आवाहन केलं गेलं, मात्र त्यानंतरही जमाव शांत न होता पोलिसांना भिडला. त्यामुळं पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करून जमावावर नियंत्रण मिळवलं. हे चित्र पाहून परिसरातल्या नागरिकांना धडकी भरली. मात्र काही वेळातच हे फक्त मॉकड्रील असल्याचं स्पष्ट झालं आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. अंबरनाथ विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश सातव यांच्या उपस्थितीत हे मॉकड्रिल पार पडलं.

Badlapur News
Latur : जुळ्या बहिणींची कमाल; विभक्त राहून सुद्धा दहावीत मिळविले सारखेच गुण

यावेळी बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे, बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत सोंडे यांच्यासह ८ पोलीस अधिकारी, ४९ कर्मचारी, बदलापूर पालिकेच्या अग्निशमन दलाचे जवान आणि भारत कॉलेजचे विद्यार्थी या मॉकड्रिलमध्ये सहभागी झाले होते. एखाद्या भागात दंगलसदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस कशाप्रकारे लाठीचार्ज, अश्रूधुराचा वापर करून जमावावर नियंत्रण मिळवतात आणि परिस्थिती नियंत्रणात आणतात, याबाबत यावेळी अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com