मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे; 'तो' व्हिडीओ पोस्ट करत मनसेला आठवली दुनियादारी!

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर ईडीच्या रडारवर आले असताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
Sandip Deshpande and Uddhav Thackeray | MNS Deshpande Shared Post
Sandip Deshpande and Uddhav Thackeray | MNS Deshpande Shared PostSaam Tv
Published On

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे मेहुणे श्रीधर पाटणकर ईडीच्या रडारवर आले असताना मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्विट करून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. मराठी चित्रपट दुनियादारी मधील एक दृश्य (Scene) ट्विट करत पाहुणे आले घरापर्यंत असे त्यांनी म्हण्टलं आहे.

कालच्या ईडीच्या कारवाईवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. राजकीय वर्तुळातून विविध प्रतिक्रिया देखील देखील येत आहेत. विरोधी पक्षाकडून या मुद्द्यावरून चांगलीच टीका केली जात आहे, तर मात्र, सत्ताधारी पक्षाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agencies) गैरवापर केला जात असल्याचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. यातच आता मनसेकडून या सगळ्या प्रकरणावर खोचक टोला लगावला आहे. एका मराठी चित्रपटातली व्हिडीओ क्लिप ट्वीट करून मनसेने मुखमंत्र्यांना टोला लागावंला आहे.

Sandip Deshpande and Uddhav Thackeray | MNS Deshpande Shared Post
कालचे प्रकरण ही फक्त सुरुवात;किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

दुनियादारीतला 'तो' सिन..;

या सर्व ईडीच्या कारवाईनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ क्लिप (Video Clip) शेअर केली आहे. दुनियादारी या मराठी चित्रपटातली ही व्हिडीओ क्लिप आहे. त्यात अभिनेता जितेंद्र जोशी हा “मेव्हणे, मेव्हणे, मेव्हण्यांचे पाहुणे” हा डायलॉग बोलताना दिसत आहे. तसेच देशपांडे यांनी या व्हिडीओसोबत “पाहुणे आले घरापर्यंत” असे कॅप्शन देखील दिले आहे.

काल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे बंधू श्रीधर पाटणकर (Shridhar Patanakar ED Raid) यांच्यावर ता. 22 काल मंगळवारी ईडीने मोठी कारवाई केली. त्यांच्या साईबाबा गृहनिर्माण प्रा. लि.च्या मालकीच्या 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत.

कारवाई का झाली?

उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. च्या 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. ठाण्यातल्या (Thane) वर्तकनगर या उच्चभ्रू भागात असलेल्या निलांबरी अपार्टमेंट्समध्ये या 11 सदनिका आहेत. हा साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि.चा प्रकल्प (Project) असून त्यावरून वाद सुरू झाला आहे. ईडीला संशय आहे की, काळा पैसा बनावट कंपन्यांच्या माध्यमातून या प्रकल्पाकडे वळवण्यात आला आहे. यातून ही कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com