कालचे प्रकरण ही फक्त सुरुवात;किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारला इशारा

हवालाकिंग नंदकीशोर चतुर्वेदी आणि उध्दव ठाकरे यांचे परिवारीक संबंध आहेत.
Kirit Somaiya Warns Thackeray Government
Kirit Somaiya Warns Thackeray GovernmentSaam Tv
Published On

मुंबई: काल ईडीने मुंबईत कुर्ला आणि ठाण्यात छापेमारी केली. यादरम्यान मोठी कारवाई करत ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या मेहुण्याला मोठा दणका दिला. ईडीने श्रीधर पाटणकर यांच्या ठाण्यातल्या 11 सदनिका सील केल्या आहेत. यामुळे राज्याचे राजकारण चिघळले आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हवालाकिंग आहेत त्यांचे आणि ठाकरे कुटुंबाचे परिवारीक संबंध असल्याचा गौप्यस्फोट भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी केला आहे.

काल भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या यांनी ईडीने (ED) कालेल्या कारवाईची माहिती ट्विट (Tweet) करत दिली. आज सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. आता यावर शिवसेनेकडून (Shivsena) काय प्रतिक्रिया येते हे पाहावे लागणार आहे.

Kirit Somaiya Warns Thackeray Government
ED on Shridhar Patankar :पाटणकरांवरील ईडी कारवाईवर काय आहेत नेत्यांच्या प्रतिक्रिया ?;पाहा व्हिडीओ

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेहुण्यावरील कारवाई ही फक्त सुरुवात आहे. हवालाकिंग नंदकीशोर चतुर्वेदी आणि उध्दव ठाकरे (uddhav thackeray) यांचे परिवारीक संबंध आहेत. इथून पुढच्या काळात महाराष्ट्रला घोटाळेमुक्त करण्याचा संकल्प आहे. आम्ही तो करणार असल्याचा इशाराही किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी यावेळी दिला.

6 कोटी 45 लाखांची मालमत्तेवर कारवाई

ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या श्री साईबाबा गृहनिर्मिती प्रा. लि. कंपनीवर मंगळवारी कारवाई केली आहे. या कंपनीच्या मालकीच्या ठाण्यातील निलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांवर ‘ईडी’ने कारवाई केली. ही मालमत्ता 6 कोटी 45 लाखांची आहे.

Edited By- Santosh Kanmuse

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com