Raj Thackeray
Raj ThackeraySaam TV

Raj Thackeray: माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'; राज ठाकरेंची महाराष्ट्र दिनानिमित्त खास पोस्ट

Raj Thackeray Latest News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पहिली पोस्ट केली आहे.

Raj Thackeray on Maharashtra Day

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त आपल्या अधिकृत X अकाउंटवरून पहिली पोस्ट केली आहे. या पोस्टमधून त्यांनी राज्यातील नागरिकांना महाराष्ट्र तसेच कामगार दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. याशिवाय राज ठाकरे यांनी ऑडिओ क्लिप देखील शेअर केली आहे.

Raj Thackeray
Nashik Lok Sabha: महायुतीचं अखेर ठरलं! नाशिकमधून 'या' नेत्याच्या नावावर शिक्कामोर्तब? आज होणार घोषणा!

माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म'... आपणा सर्वांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे 'अखंड महाराष्ट्र दिना'च्या मन:पूर्वक शुभेच्छा, असं कॅप्शन देत राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे.

या ऑडिओ क्लिपमध्ये राज ठाकरे यांनी जुन्या भाषणातून महाराष्ट्राबद्दल जे मनोगत व्यक्त केलंय, त्यातील काही प्रमुख मुद्दे आहेत. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून जेव्हा मनसेची स्थापना केली. त्यावेळी मी स्वत:ला महाराष्ट्राला अर्पण करीत आहे, असं म्हटलं होतं.

तेच वाक्य या शेअर केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. संयुक्त महाराष्ट्राबाबत राज ठाकरेंनी मांडलेले काही प्रमुख मुद्देही या ऑडिओ क्लिपमध्ये आहे. याशिवाय संपूर्ण महाराष्ट्र हाच माझा मतदारसंघ हे आपल्या भाषणातील वाक्य राज ठाकरेंनी या ऑडिओ क्लिपमध्ये आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त इंस्टाग्रामवर रील देखील बनवले आहे. पुण्याचा प्रसिद्ध रिल्स स्टार अथर्व सुदामेसोबत त्यांनी हे रील बनवले आहे. अथर्वने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून हे रील पोस्ट केले आहे. या रिल्समध्ये राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त भाषणाची तयारी करणाऱ्या अथर्वला या दिवसाचा खरा अर्थ आणि आपण काय करायला हवं हे समजावून सांगताना दिसून येत आहे.

राज ठाकरे यांचे महाराष्ट्र आणि मराठी माणसावरील प्रेम सर्वश्रूत आहे. त्यांनी आजवर मराठी माणसाच्या हक्कासाठी अनेकदा आवाज उठवला आहे. तसेच राज हे अनेकदा आपल्या भाषणातून मराठी तरुणांना नोकरी तसेच उद्योगधंद्याबाबत वेगवेगळी आवाहने करत असतात.

Raj Thackeray
Cylinder Price: LPG सिलिंडर झाला स्वस्त, निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा; वाचा नवे दर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com