Cylinder Price: LPG सिलिंडर झाला स्वस्त, निवडणुकीच्या धामधुमीत सर्वसामान्यांना मोठा दिलासा; वाचा नवे दर...

LPG Cylinder Price: लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एलपीजी गॅस सिलिंडर स्वस्त झाला आहे.
LPG Gas Cylinder Rates Today
LPG Gas Cylinder Rates Today Saam TV

LPG Gas Cylinder Price

देशभरात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तेल विपणन कंपन्यांनी महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलिंडरच्या दरात कपात केली आहे. त्यानुसार, एलपीजी सिलिंडर आजपासून १९ रुपयांनी स्वस्त झाला आहे. मात्र, हे बदल केवळ व्यावसायिक सिलिंडरच्या दरात झाले आहेत.

LPG Gas Cylinder Rates Today
New Rule Change From May: १ मे २०२४ पासून होणार अनेक महत्वाचे बदल; दुर्लक्ष केल्यास होऊ शकतं मोठं नुकसान

तेल कंपन्यांनी १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या (LPG Cylinder Price) किमतीत कोणताही बदल केलेला नाही. मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर शहरात घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. यापूर्वी १ एप्रिल रोजी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३० रुपयांची कपात करण्यात आली होती.

आता तेल कंपन्यांनी पुन्हा १९ रुपयांची कपात केल्यानंतर दिल्लीत व्यावसायिक सिलिंडरची (Gas Cylinder) किंमत १७४५.५० रुपये झाली आहे. तर मुंबईत व्यावसायिक सिलिंडर १६९८.५० आणि चेन्नईमध्ये १९११ रुपयांना मिळणार आहे. आजपासून हे नवीन दर लागू करण्यात आले आहेत.

यापूर्वी फेब्रुवारी आणि मार्चमध्ये सलग दोन महिने १९ किलोच्या सिलिंडरची किंमत वाढवण्यात आली होती. तेल विपणन कंपन्यांनी १ मार्च रोजी त्याची किंमत १७६९.५० रुपयांवरून १७९५ रुपयांपर्यंत वाढवली होती. १ फेब्रुवारीला त्यात १४ रुपयांनी वाढ करण्यात आली होती.

घरगुती सिलिंडरचे दर किती?

घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. देशाची राजधानी दिल्लीत घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत ८०३ रुपये आहे. तर मुंबईत घरगुती सिलिंडरची किंमत ८०२.५० रुपये आणि चेन्नईमध्ये ८१८.५० रुपये आहे. त्याचवेळी उज्ज्वला लाभार्थ्यांना १४.२ किलोचा सिलेंडर ६०३ रुपयांना मिळत आहे.

LPG Gas Cylinder Rates Today
Today's Gold Silver Rate : खरेदीची सुवर्णसंधी! सलग तीन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण, मुंबई-पुण्यात आजचा भाव किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com