Kalyan News: राज ठाकरेंकडून सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र; तर कल्याणमध्ये भाजपच्या माजी उपमहापौराच्या बॅनरवर मनसे आमदाराचा फोटो, चर्चांना उधाण

Kalyan News: कल्याणमध्ये भाजपचे माजी महापौर मोरेश्वर भोईर यांच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचे फोटो झळकल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
Kalyan News
Kalyan NewsSaam tv
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan Dombivli News: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून विविध मुद्द्यावरून सत्ताधारी शिवसेना-भाजपवर टीका केली जात आहे. तर कल्याणमध्ये भाजपचे माजी महापौर मोरेश्वर भोईर यांच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचे फोटो झळकले आहेत. भोईर यांनी मनसे आमदार राजू पाटील यांचं कौतुक केलं आहे. यावरून राजकीय वर्तुळत चर्चांना उधाण आलं आहे. (Latest Marathi News)

कल्याणमध्ये भाजप माजी उपमाहापौर मोरेश्वर भोईर यांनी मनसे आमदार राजू पाटील यांचं कौतुक केल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यांच्या बॅनरवरही राजू पाटील यांचे फोटो झळकले आहे. याबाबत माजी उपमाहापौर मोरेश्वर भोईर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Kalyan News
Maharashtra Politics: 'गैरसमजाबद्दल दिलगिरी, विधानावर ठाम...' वळसे पाटलांच्या टीकेचे अजित पवार गटाकडून समर्थन

मोरेश्वर भोईर म्हणाले,'आमदार राजू पाटील हे कधीच पक्ष बघून मतभेद करत नाही. त्यांच्याकडून नेहमीच सहकार्य केले जाते. माझ्या वार्डात देखील निधी देत त्यांनी विकास कामाला गती देण्याचं काम केलं. त्या अर्थी बॅनरवर त्यांचा फोटो येणे हे क्रमप्राप्त आहे. त्याचा दुसरा काही राजकीय अर्थ नाही, असे स्पष्टीकरण दिलं आहे. दरम्यान, भाजप उपमाहापौराच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो झळकल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

एकीकडे मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सत्तेत असलेल्या भाजपवर टीका केली जाते. दुसरीकडे भाजपच्या नगरसेवकाकडून फक्त बॅनर नाही तर आमदार राजू पाटील यांच्या कामाचे कौतुकही करण्यात आले आहे.

कल्याण ग्रामीण पिसवलीमध्ये रस्ते कॉन्क्रीटीकरणाच्या कामाचे भूमीपूजन कार्यक्रमादरम्यान हा प्रसंग घडला आहे. कल्याण ग्रामीण भागातील पिसवली भागात भाजप माजी उपमहापौर मोरेश्वर भोईर यांच्याकडून रस्ते कॉन्क्रीटीकरण कामाचे भूमीपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात भाजप नगरसेवकाच्या बॅनरवर मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो होता.

या प्रकरणी माजी उपमहापौर भोईर यांनी भाजपच्या बॅनरवर मनसे आमदारांचा फोटो हा विषय नाही. माझ्या प्रभागात विकासासाठी मी प्रयत्नशील असतो. आमदार पाटील यांच्याकडे विकास कामाकरीता पाठपुरावा केला होता. त्यांच्याकडून आम्हाला विकास कामाकरीता निधी प्राप्त झाल्याचे सांगितले.

Kalyan News
Chitra Wagh News: 'दररोज मासे खाल्ल्याने ऐश्वर्या रायचे डोळे सुंदर' गावितांच्या वक्तव्यावर चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया; म्हणाल्या...

'मनसे आमदार राजू पाटील यांचा फोटो बॅनरवर त्यांचा फोटो येणे हे क्रमप्राप्त आहे. त्याचा दुसरा काही राजकीय अर्थ नाही. भाजपमध्ये मी समाधानी आहे. यापुढेही भाजपचेच काम करणार. मनसेचे आमदार हे कल्याण ग्रामीणचे खऱ्या अर्थाने आमदार आहे. त्या दृष्टीने ते काम करीत आहेत, असेही भोईर यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com