Dombivli Building Collapse: धोकादायक निमंत्रणाबाबत आता तरी निर्णय घ्या; राजू पाटील यांची शिंदे सरकारकडे मोठी मागणी

Dombivli Building Collapse: घटनास्थळी भेट दिल्यानंतर राजू पाटील यांनी ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली
Dombivli Building Collapse
Dombivli Building CollapseSaam tv

अभिजीत देशमुख

Raju Patil News:

डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. डोंबिवलीतील आदिनारायण इमारत कोसळण्याचा घटनेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळी भेट दिल्यानंतर राजू पाटील यांनी ही घटना दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. तसेच धोकादायक इमारतींबाबत लवकर निर्णय घेण्याची मागणी राजू पाटील यांनी सरकारला केली. (Latest Marathi News)

डोंबिवलीतील आदिनारायण इमारत कोसळल्यामुळे आतापर्यंत दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. घटनेनंतर आमदार राजू पाटील यांनी घटना स्थळी भेट दिली. भेट दिल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू पाटील म्हणाले, 'इमारत कोसळण्याची घटना दुर्देवी असून हीच इमारत नव्हे तर संपूर्ण डोंबिवलीत अशीच परिस्थिती आहे.

Dombivli Building Collapse
Dombivli Building Collapse: डोंबिवलीत मोठी दुर्घटना; तीन मजली इमारत कोसळून दोघांचा मृत्यू

'डोंबिवलीच्या आजूबाजूच्या गावामध्ये याच प्रकारे विकास झाला आहे. त्यामुळे क्लस्टर व्यतिरिक्त उल्हासनगरच्या पार्श्वभूमीवर आणखी कुठल्यातरी योजना आणून त्यांची एक पॉलिसी बनवली पाहिजे अशी मागणी करणार आहे, असे राजू पाटील म्हणाले.

'शासनाने जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी. पालिकेने देखील मदत करावी. धोकादायक इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा आणि त्याच्याबद्दल काहीतरी निर्णय घ्या. आता तरी शहाणे व्हा, असे आवाहन राजू पाटील यांनी पालिकेला केले.

मनसे आमदार राजू पाटील पुढे म्हणाले,'आज घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहे. पालिका नोटीस देते, मात्र काही गोष्टी त्यांच्या हातात नसतात. ते जबरदस्तीने कोणाला खाली करू शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे'.

'पहिली क्लस्टर योजना ठाणे किसन नगर परिसरात घोषित झाली, त्याचं अजून काही झालेलं नाही. त्यामुळे लोकांमध्ये संभ्रम आहे. क्लस्टरला पर्याय म्हणून खासगी बिल्डर कसे डेव्हलप करू शकतील, याचा विचार करणे आवश्यक आहे. याबाबत आम्ही तसा पाठपुरावा आणि मागणी करू, असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com