Sandeep Deshpande: मोठी बातमी! 'राज ठाकरेंना मारण्याची सुपारी दिली होती...' संदीप देशपांडे यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबईतल्या गुंडांना शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरेंची सुपारी दिली होती, असे विधान संदीप देशपांडे यांनी केले आहे.
Raj Thackeray
Raj Thackeray saam tv
Published On

Sandip Deshpande: काही दिवसांपूर्वी शिवसेना नेते संजय राऊत यांनी माझ्या हत्येची सुपारी देण्यात आल्याचा गौप्यस्फोट केला होता. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली होती. यानंतर आता मनसे नेते संदिप देशपांडे (Sandip Deshpande) यांनी राज ठाकरेंच्या हत्येची शिवसैनिकांकडून सुपारी देण्यात आली होती, असा खळबळजनक खुलासा केला आहे.

आज घाटकोपर (पूर्व) विधानसभेत "घे भरारी" अभियानाअंतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जाहीर सभा घेण्यात आली होती. या सभेत संदीप देशपांडे यांनी हे मोठे विधान केले आहे.

Raj Thackeray
Narayan Rane: 'नादी लागू नका, नाहीतर पुण्यात येऊन…' नारायण राणेंचा अजित पवारांना इशारा; 'त्या' वक्तव्यावरुन केला हल्लाबोल

याबाबत अधिक माहिती अशी की, “मुंबईतल्या गुंडांना शिवसेनेच्या माध्यमातून राज ठाकरेंची सुपारी दिली होती. मालवणमध्ये राज ठाकरेंच्या घातपाताचं षडयंत्र होतं. नारायण राणेंवर नाव येण्यासाठी मालवणमध्ये घातपाताचं षडयंत्र आखलं होतं.आपल्या पक्षातील प्रतिस्पर्धीचा काटा काढता येईल, अशाप्रकारचं नीच राजकारण झालं होतं”, असा गंभीर आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

तसेच याबद्दल पुढे बोलताना ज्यावेळी नारायण राणे यांनी शिवसेनेतून बंड केलं तेव्हा शिवसैनिकांची मालवणमध्ये जाण्याची हिंमत नव्हती, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

Raj Thackeray
Pune: कसब्याचं राजकारण तापलं! धंगेकरांविरोधात भाजप आक्रमक; उमेदवारी रद्द करण्याची मागणी

उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल..

"ज्यावेळी 1988 ला राज ठाकरे (Raj Thackeray) भारतीय विद्यार्थी सेना चालवत होते तेव्हा उद्धव ठाकरे हे फोटो काढत होते. जाहीरात एजन्सी चालवत होते. 1995 मध्ये राज ठाकरेंनी 80 सभा घेतल्या. तीन महिने राज ठाकरे सभा करत फिरत होते. ज्यावेळी 1995 मध्ये शिवसेना भाजपाची सत्ता आली त्यावेळी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडायला लागली”, असेही संदीप देशपांडे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com