Raj Thackeray: राज ठाकरे वाघ आहेत, त्यांचा कोल्हा करण्याचे प्रयत्न सुरू: विजय वडेट्टीवार

Mns Gudhi Padwa Melava 2024: ''राज ठाकरे दिल्ली पुढे झुकणार नाही, अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे. राज ठाकरे हा वाघ माणूस आहे. पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न आहे'', असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
Vijay Wadettiwar on Raj Thackeray
Vijay Wadettiwar on Raj ThackeraySaam Tv

Vijay Wadettiwar on Raj Thackeray:

''राज ठाकरे दिल्ली पुढे झुकणार नाही, अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे. राज ठाकरे हा वाघ माणूस आहे. पण त्यांना कोल्हा करण्याचा प्रयत्न आहे'', असं विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. शिवतीर्थावर (Shivaji Park) आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा (MNS Gudhi Padwa Melava) पार पडणार आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना ते असं म्हणाले आहेत.

विजय वडेट्टीवार म्हणाले की, राज ठाकरे दिल्लीच्या सत्तेपुढे कधी झुकणार नाही, असे सांगत होते. पण त्यांना दिल्लीची वारी करावी लागली. यात कुठेतरी राज ठाकरे यांना अडचणीत आणण्याचे काम आणि त्यांना पिंजऱ्यात अडकवण्याचे काम होत आहे का, अशी शंका महाराष्ट्रातील जनतेला आहे. राज ठाकरे दिल्लीपुढे झुकणार नाही, अशी मराठी माणसांची अपेक्षा आहे, असेही ते म्हणाले.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Vijay Wadettiwar on Raj Thackeray
MNS Melava: कल्याण-डोंबिवलीतून हजारो मनसैनिक शिवतीर्थावर दाखल; राज ठाकरेंना ऐकण्यासाठी उत्सुक

दरम्यान, मनसेच्या गुढीपाडवा मेळावा सुरु झाला असून थोड्याच वेळेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे शिवतीर्थावर येणार आहेत. राज ठाकरे आज महायुतीत सहभागी होण्याबाबत मोठी घोषणा करू शकतात, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  (Latest Marathi News)

दिल्लीत ज्येष्ठ भाजप नेते अमित शाह यांच्या भेटीनंतर मनसे बाबत अनेक चर्चा सुरू झाल्या. यातच आजच्या मेळाव्यात राज ठाकरे स्वतः महायुतीबाबत निर्णायक भूमिका जाहीर करू शकतात, असं सूत्रांचं म्हणणं आहे.

Vijay Wadettiwar on Raj Thackeray
Ajit Pawar On Vijay Shivtare: विजय शिवतारेंच्या बंडामागे कोणाची फूस, अजित पवारांनी भरसभेत केलं उघड

राज्यभरातून मनसे कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल

मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याला राज्यभरातून कार्यकर्ते शिवतीर्थावर दाखल झाले आहेत. हजारोंच्या संख्येने मनसैनिकांनी राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी येथे गर्दी केली आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूरसह राज्यभरातील मनसे कार्यकर्ते येथे दाखल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com